नवी दिल्ली/प्रतिनिधी ः भारत देश गेल्या 9 वर्षांपासून विकासांमध्ये मोठी झेप घेत आहे, तेच विरोधकांना खुपत आहे, त्यामुळे विरोधकांकडून आमच्यावर खालच्

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः भारत देश गेल्या 9 वर्षांपासून विकासांमध्ये मोठी झेप घेत आहे, तेच विरोधकांना खुपत आहे, त्यामुळे विरोधकांकडून आमच्यावर खालच्या पातळीवर टीका होत आहे, मात्र विरोधकांना गरिबांशी काहीही घेणे-देणे नसून, त्यांना केवळ सत्तेची भूक असल्याची घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी अविश्वास प्रस्तावावर प्रत्युत्तर देतांना केले.
यावेळी संबोधित करतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, विरोधक आमच्या अविश्वास प्रस्ताव आणत असले तरी, जनतेने निवडणुकीमध्ये त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव मंजूर करून, भाजप-एनडीए अधिक जागा घेऊन सत्तेत आले, त्यामुळे यावेळीही हा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी फायदेशीर ठरणार असून 2024 सालच्या निवडणुकीत आम्ही नव्या विक्रमासह निवडून येणार असल्याचा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले. सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव नसून विरोधकांची परीक्षा आहे असेही ते म्हणाले. आतापर्यंत अनेकदा लोकांना विश्वास व्यक्त केला, त्यांचे आभार मानतो. देव दयाळू आहे, तो कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपली इच्छा पूर्ण करतो. विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव आणला, याबद्दल मी देवाचे आभार मानतो. गेल्या वेळी म्हणजे 2018 साली देखील विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपला आणि एनडीएला मोठ्या प्रमाणात यश मिळाले. जनतेनेही विरोधकांवर विश्वास दाखवला नाही. त्यामुळे विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव हा आम्हाला एक प्रकारचा लाभ असतो. येणार्या निवडणुकीतही एनडीए नवा रेकॉर्ड करून सत्तेत येणार यात शंका नाही. गेल्या तीन दिवसांपासून या मुद्द्यावर विविध पक्षांच्या नेत्यांनी आपले मत मांडले आहे., विरोधकांनी मात्र याचं गांभीर्य पाळले नाही. विरोधकांनी जनतेचा विश्वासघात केला असून त्यांना लोकांपेक्षा आपल्या पक्षाची जास्त चिंता आहे. विरोधकांना जनतेच्या भूकेची चिंता नाही, त्यांच्या राजकारणाची चिंता असल्याचा टोला पंतप्रधानांनी लगावला. तसेच यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदींनी ज्यांचे स्वतःचे वहीखाते बिघडलेले आहे, ते आमच्याकडून हिशोब मागत असल्याची टीका केली. अविश्वास प्रस्तावासाठी पाच वर्षे दिले तरी विरोधकांची पूर्ण तयारी नाही. अटल बिहारी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आल्यानतंर शरद पवारांनी भाषण दिले, 2004 सालच्या अविश्वास प्रस्तावावेळी सोनिया गांधी यांनी भाषण दिलं. 2018 साली मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाषण दिले. पण यावेळी सर्वात मोठ्या विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या अधीर रंजन यांना भाषण करु दिले नाही, त्यांचे नावच या यादीत नसल्याचे म्हटले आहे.
विरोधकांचा अविश्वास आमच्यासाठी शुभ – अविश्वास प्रस्तावावर बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, विरोधक तयारी करून अधिवेशनात येत नाही. काय हाल झाले आहेत? विरोधकांनी देशाला निराशेशिवाय काही दिले नाही. फिल्डिंग विरोधकांनी लावली आणि चौकार- षटकार आमच्या खासदारांनी लगावले. विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव नेहमीच आमच्यासाठी शुभ असतो. एनडीए आणि भाजप 2024 मध्ये पुन्हा सर्व रेकॉर्ड मोडून सत्तेत येईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. तसेच विरोधक ज्यावेळेस तिसर्यांचा अविश्वास आणतील तेव्हा देशाची अर्थव्यवस्था पहिल्या तीन देशांमध्ये असतील, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
COMMENTS