Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खर्ड्यामध्ये कांद्याच्या पिकात अफूची शेती; दोघांविरोधात गुन्हा ; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

जामखेड : तालुक्यातील खर्डा हद्दीतील बांधखडक शिवारात कांद्याच्या पिकाच्या आडोशाने अफूची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खर्डा पोलिसांनी केले

विचारांचा दुष्काळ दूर करण्यासाठी ज्ञानेश्वरीची रचना : हभप म्हस्के
पोलीस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्लाचौघांसह ११ अनोळखी इसमांवर गुन्हा
भर बाजारात कमानीचा स्लॅप कोसळला; चार महिला बालंबाल बचावल्या

जामखेड : तालुक्यातील खर्डा हद्दीतील बांधखडक शिवारात कांद्याच्या पिकाच्या आडोशाने अफूची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खर्डा पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे ६ लाख १७ हजार ७२५ रुपये किमतीची २२ किलो ५६१ ग्रॅम अफूची झाडे जप्त करण्यात आली. याप्रकरणी दोघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस हवालदार संदीप धामणे यांच्या फिर्यादीवरून बांधखडक येथील सुधाकर एकनाथ वारे आणि मारुती विश्वनाथ वारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्जत तालुक्यातील चापडगाव येथे अलीकडेच अफूच्या शेतीवर कारवाई झाल्यानंतर जामखेड तालुक्यातील हा प्रकार समोर आला आहे. बांधखडक शिवारातील गट क्रमांक १९१ व १९२ मध्ये आरोपींनी कांद्याच्या पिकामध्ये अफूची लागवड केल्याची माहिती खर्डा पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाने सरकारी व खासगी वाहनांमधून घटनास्थळी जाऊन छापा टाकला.

यावेळी शेतात कांद्याच्या पिकाच्या आडोशाने प्रतिबंधित अफूची लागवड केल्याचे निदर्शनास आले. आरोपींनी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून या झाडांना खत व पाणी देऊन त्यांचे संवर्धन केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, कर्जत विभागाच्या फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी जाऊन पुरावे गोळा केले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय अधिकारी प्रवीणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि उज्वलसिंग राजपूत, संभाजी शेंडे, संदीप धामणे, गोकुळ इंगवले, प्रवीण थोरात, विष्णू आवारे, धनराज बिराजदार, शाम चखाले, बाळू खाडे, अशोक बडे, शशी म्हस्के, मुन्ना शेख, चालक शकिल बेग व संजय गुंड यांच्या पथकाने केली. पुढील तपास सपोनि उज्वलसिंग राजपूत करीत आहेत.

COMMENTS