Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात पुन्हा ‘ऑपरेशन लोटस’ !

भाजपकडून दोनवेळेस पक्षप्रवेशाची ऑफर काँगे्रस नेते सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट

सोलापूर ः महाराष्ट्रात शिवसेनेतील बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर दोन्ही गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. यानंतर रा

 ओबीसी महिला सरपंच व सरपंच प्रतिनिधी यांना ग्रामपंचायत सदस्या कडून मारहाण 
अकोल्यामध्ये ट्रकच्या धडकेत पती-पत्नीचा मृत्यू
वीज वितरण विभागाच्या विद्युत पोलांवरील सी चॅनल चोरी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

सोलापूर ः महाराष्ट्रात शिवसेनेतील बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर दोन्ही गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. यानंतर राज्यात पुन्हा मोठा भूकंप होण्याचा दावा भाजपचे वरिष्ठ नेते करतांना दिसून येत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपच्या या छुप्या ऑपरेशनची पोलखोल केली आहे. भाजपने मला व माझी मुलगी आमदार प्रणिती शिंदे हिला दोनदा ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे.
काँगेस नेते शिंदे यांच्या या गौप्यस्फोटामुळे काँगे्रसचे बडे नेते भाजपच्या रडारवर असून, भाजपचे ऑपरेशन लोटस अजूनही संपलेले नसल्याचे यातून दिसून येत आहे. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या स्नेहमेळाव्यात बोलताना त्यांनी ही धक्कादायक माहिती दिली. भाजपचे काही नेते मला आणि प्रणितीला भाजपमध्ये या म्हणून सांगत होते. दोनदा तसा प्रयत्न झाला. पण ते शक्य नाही, असे सुशीलकुमार शिंदे यांनी ठणकावून सांगितले आहे. भाजपने मला व माझ्या मुलीला पक्षात येण्याची ऑफर दिली होती. मात्र मी काँग्रेसमध्येच राहणार आहे, असा खुलासाही सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. मात्र सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याने सोलापुरात राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असल्याची चर्चा सुरु झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍या आधीच सोलापुरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. मात्र मुलगी परत निवडून येणार नाही असे वाटत असल्याने तिला भाजपमध्ये पाठवण्याची तयारी असेल, अशा शब्दात भाजप आमदार नितेश राणे यांनी टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटील हे सोलापूरचे पालकमंत्री आहेत. ते बुधवारी सुशीलकुमार शिंदे यांच्या गौप्यस्फोटानंतर शिंदे यांच्या निवासस्थानी गेले. यावेळी दोन्ही नेत्यांची भेट झाली. सोलापूरमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या निमंत्रण देण्यासाठी दोन्ही नेत्यांची भेट झाल्याची माहिती समोर आली. पण आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर या भेटीला जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे.

ऑफर ही गुप्त असते ः मंत्री चंद्रकांत पाटील – काँगे्रस नेते सुशीलकुमार शिंदे व भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यात झालेल्या भेटीनंतर चंद्रकांतदादा यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ही माझी केवळ सदीच्छा भेट होती. पालकमंत्री या नात्याने मी त्यांच्याकडे आलो आहे. आणि भाजपकडून कोणतीही ऑफर त्यांना देण्यात आलेली नाही. आणि कोणतीही राजकीय ऑफर अशी जाहीर पणे दिली जात नसते. ती गुप्त पद्धतीने असते.

COMMENTS