नगर – भाजप सेना युतीच्या काळातील दिवस मंतरलेले होते. पुन्हा युती व्हावी ही प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे. पण भविष्यात युती होईल का याचे काळच उत्त
नगर – भाजप सेना युतीच्या काळातील दिवस मंतरलेले होते. पुन्हा युती व्हावी ही प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे. पण भविष्यात युती होईल का याचे काळच उत्तर देईल. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पद देवून योग्य न्याय देणारा भाजप पक्ष आहे. माझ्या मनीध्यानी नसताना बीएसएनएल या देशातील सर्वात मोठ्या टेलीफोन कंपनीच्या राष्ट्रीय संचालक पदी पक्षाने माझी नियुक्ती केली आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने व विचारावर काम करणाऱ्या पतसंस्थेत सत्कार होणे हे भाग्याचे आहे, असे प्रतिपादन भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष रवींद्र बोरावके यांनी केले.
पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या वतीने चेअरमन वसंत लोढा यांनी रवींद्र बोरावके यांची बीएसएनएलच्या राष्ट्रीय संचालक पदी नियुक्ती झाल्याबद्दल, संभाजी कदम यांची शिवसनेच्या शहर प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल, विश्व हिंदू परिषदेच्या प्रांत सहमंत्रीपदी विवेक कुलकर्णी यांची नियुक्ती झाल्याबद्दल, सुहास मुळे यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्या बद्दल, वसंत राठोड यांची भिंगार छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल व अजित रेखी यांची जिल्हा वाचनालयाच्या संचालक पदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी दीनदयाळ पतसंस्थेचे मानद सचिव विकास पाथरकर, ज्येष्ठ संचालक सुधीर पगारिया, नरेंद्र श्रोत्री, प्रा.मधुसूदन मुळे, माजी महापौर भगवान फुलसुंदर, बाबासाहेब वाकळे, संतोष गेनाप्पा, मिलींद गंधे, सचिन पारखी, अनिल सबलोक, आनंद लहामगे, अशोक कानडे आदींसह विविध क्षेत्रातिल नागरिक व भाजप शिवसेनाचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविकात वसंत लोढा म्हणाले, नगर शहराची अविकासामुळे अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. ज्याप्रकारे पोपट पवार यांनी हिवरे बाजारचा सर्वांगीण विकास केला आहे, त्याच प्रकारे त्यांनी नगर शहराच्या विकासात लक्ष घालावे. कार्यबाहुल्यामुळे ते या सत्कार समारंभास येवू शकले नसले तरी त्यांना मी विनंती करत आहे. त्यांनी जर नगर शहराचा विकास केला तर त्यांना नक्कीच भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार मिळेल. महापालिकेच्या सत्ताधारींना स्वायत्तता नाहीये, कारभारात कोणीतरी वेगळ्या पद्धतीने हस्तक्षेप करत असल्याने शहराची अशी बिकट अस्वस्थ झाली आहे. संभाजी कदम म्हणाले, शिवसेना भाजप युतीने नगर शहरासाठी गेले २५ वर्ष खूप चांगले काम केले आहे. हे सर्वांच्या स्मरणात आहे. सुरेखा कदम यांना महापौर होण्यासाठी दीनदयाळ पतसंस्थेचे मोलाचे सहकार्य मला केले होते. यावेळी विवेक कुलकर्णी यांनी नगर मध्ये वाढत असलेल्या लव्ह जिहादच्या घटना थांबवण्यासाठी सर्वांनी पुढे प्रयत्न करण्याचे आवाहन केले. डॉ.सुहास मुळे यांनी महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे व जनरल बिपीन रावत यांच्या निधनानंतर सोशल मिडीयावर त्यांची बदनामी करणाऱ्या घाणेरड्या मनोवृत्तीचा निषेध केला. सचिव विकास पाथरकर यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून गेल्या ३० वर्षापासून होत आहे. विविध क्षेत्रात नियुक्ती झालेल्यांचा कायमच येथे सन्मान होत आहे, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुनील पंडित यांनी केले. सुधीर पगारिया यांनी आभार मानले. पतसंस्थेचे व्यवस्थापक निलेश लाटे व सहव्यवस्थापक सुखदेव दरेकर यांनी कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
COMMENTS