Homeताज्या बातम्यादेश

तरच, संविधानावरील विश्‍वास दृढ होईल सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा विश्‍वास

नवी दिल्ली ः देशामध्ये जेव्हा अनिश्‍चिततेचे ढग दाटून आलेले असतील, जेव्हा अस्पष्टता आणि अनिश्‍चततेच्या वातावरणात संसद, सर्वोच्च न्यायालय आणि निवडण

शिक्षण विभागात भ्रष्टाचाराची बजबजपुरी !
गुजरात मॉडेल बुडालं; पावसाचा धक्कादायक Video
आईस्क्रीम खाण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर गोळीबार 

नवी दिल्ली ः देशामध्ये जेव्हा अनिश्‍चिततेचे ढग दाटून आलेले असतील, जेव्हा अस्पष्टता आणि अनिश्‍चततेच्या वातावरणात संसद, सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाने पुढे येऊन काम केले तरच लोकांचा संविधानावरील विश्‍वास दृढ होईल असे मत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले आहे. बांगलादेशच्या राजधानीत ‘साऊथ एशियन कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट कॉन्फरन्स’मध्ये बोलत असताना डीवाय चंद्रचूड यांनी आपले विचार प्रकट केले.
आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले, संविधान हे प्राप्तिकर कायद्यासारखे नाही. सरकारच्या संस्थांची वैधता ही त्यांच्या कार्यक्षमतेवर आधारित असते. जेव्हा सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगासारख्या संस्था अस्पष्ट आणि अनिश्‍चिततेच्या काळात पुढे येऊन काम करतात, तेव्हाच सरकारी संस्थाची कार्यक्षमता सिद्ध होते. संविधान प्राप्तीकर कायद्यासारखे नाही, हे सांगताना प्राप्तीकर कायद्यासारखे ते वारंवार बदलता येत नसते, असे त्यांना सुचवायचे आहे. सरकारच्या यंत्रणा जसे की, संसद, केंद्रीय तपास यंत्रणा, निवडणूक आयोग किंवा सर्वोच्च न्यायालय या संस्था जेव्हा अतिशय मजबुतीने काम करतात, तेव्हाच लोकांचा संविधानावरील विश्‍वास वाढतो, असेही सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले. भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांची प्रगती होण्यामध्ये लोकशाही आणि कायद्याचे राज्य हे दोन महत्त्वाचे घटक असल्याचे यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, भारत आणि बांगलादेशमधील न्यायालयीन व्यवस्थेने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर केला पाहीजे. जेव्हा भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्यात आला, तेव्हा त्याच्या अस्तित्वाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. केवळ संविधाचा स्वीकार केल्याने विषमता नाहीशी होणार नाही. आपले संविधान प्रत्येक नागरिकाला हक्क आणि अधिकार प्रदान करते. त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी कायदेशीर हुकूम जारी करण्यासाठीच न्यायालयांची स्थापना करण्यात आली आहे, असेही सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यावेळी म्हणाले.

COMMENTS