Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कृषी वीजबिल थकबाकीच्या 50 टक्केसवलतीसाठी राहिले फक्त 19 दिवस

मुंबई / प्रतिनिधी : राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून कृषिपंप वीजजोडणी धोरण 2020 नुसार कृषिपंपाच्या वर्षानुवर्ष थकीत असलेल्

राजारामबापू कारखाना अध्यक्षपदी प्रतीक पाटील यांची निवड; उपाध्यक्षपदी विद्यमान उपाध्यक्ष विजयराव पाटील
करोनाविरुद्ध लढाईत हवाईदलही सहभागी, ऑक्सिजन-औषधं करणार एअरलिफ्ट | सुपरफास्ट महाराष्ट्र | LokNews24
तुमचे आजचे राशीचक्र सोमवार, १९ जुलै २०२१ l पहा LokNews24

मुंबई / प्रतिनिधी : राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून कृषिपंप वीजजोडणी धोरण 2020 नुसार कृषिपंपाच्या वर्षानुवर्ष थकीत असलेल्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त होण्यासाठी आता केवळ 19 दिवस राहिले आहे. कृषी वीज बिलाच्या सुधारित थकबाकीची 50 टक्के रक्कम व पूर्ण चालू वीजबिल येत्या 31 मार्चपर्यंत भरल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकीची रक्कम देखील माफ करण्यात येत आहे.
महावितरणच्या एकूण थकबाकीपैकी सप्टेंबर 2020 अखेर कृषी ग्राहकांकडे रु. 45,802 कोटी थकबाकी झाली आहे. त्यामुळे कृषी ग्राहकांच्या हितासाठी महाराष्ट्र शासनाने सर्व समावेश कृषीपंप वीजजोडणी धोरण 2020 जाहीर केले होते. या धोरणा अंतर्गत निर्लेखनाद्वारे रु. 10,420 कोटी सूट, व्याज व विलंब आकारामध्ये रु. 4,676 कोटी सूट दिल्यानंतर सुधारीत थकबाकी रु. 30,706 कोटी निर्धारित करण्यात आली आहे. त्यापैकी फक्त रु.2,378 कोटी रक्कमेचा भरणा कृषी ग्राहकांद्वारे करण्यात आला आहे. त्यापैकी 50 टक्के थकबाकीचा दि. 31 मार्च 2022 पर्यंत भरणा केल्यास उर्वरित 50 टक्के म्हणजे तब्बल 15 हजार 352 कोटी 50 लाख रूपयांची माफी शेतकर्‍यांना मिळणार आहे.
दरम्यान, ज्या शेतकर्‍यांची वीजबिलांबाबत तक्रार किंवा शंका असेल त्याचे तातडीने निराकरण करावे. या योजनेचा लाभ सर्व थकबाकीदार शेतकर्‍यांना करून देण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कृषी ग्राहकांच्या देयक दुरुस्ती संदर्भात शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. या शिबिरांमध्ये ग्राहकांचा मंजूर वीजभार, मीटर वाचन, थकबाकी या स्वरुपाच्या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात येत आहे. कृषी ग्राहकांच्या वीज देयक दुरुस्ती व मंजूरीचे प्रस्ताव महावितरणच्या संगणकीय प्रणालीद्वारे मंजूर करुन देयक दुरुस्तीनंतरची सुधारित थकबाकीची रक्कम ग्राहकाला तात्काळ कळविण्यात येत आहे. या शिबिरांचा कृषी ग्राहकांनी जास्तीत-जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कृषिपंप वीजजोडणी धोरणानुसार कृषी वीजबिलांच्या चालू व थकीत बिलांच्या भरण्यामधील 66 टक्के रकमेचा कृषी आकस्मिक निधी हा ग्रामपंचायत (33 टक्के) आणि जिल्हास्तरावर (33 टक्के) कृषी वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याप्रमाणे आतापर्यंत 2841 कोटी 85 लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. यामध्ये प्रत्येकी 937 कोटी 82 लाख रुपयांचा निधी हा ग्रामपंचायत व जिल्हा क्षेत्रातील वीजयंत्रणेच्या विकास कामांसाठी वापरण्यात येत आहे. त्यामुळे कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या, योग्य दाबाने व सुरळीत वीज पुरवठ्यासह स्थानिक वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाला वेग मिळाला आहे.
सुधारित थकबाकीमध्ये 50 टक्के माफी मिळविण्याची संधी येत्या 31 मार्च 2022 पर्यंत असल्याने थकबाकीदार शेतकर्‍यांनी या योजनेत सहभागी व्हावे. थकबाकीमुक्त योजनेचा जास्तीत-जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

COMMENTS