Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाफेडच्या सब एजन्सी कडून कांदा खरेदी सुरू

अटी शर्ती मुळे शेतकरी त्रस्त

नाशिक प्रतिनिधी - सध्या कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आव

कांद्याच्या किमतीत मोठी घट केंद्र सरकारची माहिती
शेती महामंडळाच्या स्थावर व्यवस्थापक पदावर आता तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेमणुकीस सुरुवात
कृषि विद्यापीठाच्या क्षारपड जमीन क्षारमुक्त

नाशिक प्रतिनिधी – सध्या कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराबाहेर नाफेडच्या सबएजन्सीच्या सब एजन्सीकडून कांदा खरेदीला सुरुवात झाली आहे. याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय मात्र कागदपत्रांच्या अटीशर्तीच्या पूर्ततेमुळे शेतकरी त्रस्त आहेत.

नाफेड ने नेमलेल्या एजन्सी न्यूट्रोव्ही ऍग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या वतीने त्यांची सब एजन्सी कृष्णधारा फार्मर्स प्रोडूसर कंपनीने लासलगाव येथे कांदा खरेदी केंद्र सुरू केले आहे. या केंद्रावर गेल्या दोन दिवसात 720 क्विंटल कांदा खरेदी झाला असून 870 ते 937 रुपये इतका दर प्रतिक्विंटाला देण्यात आला आहे. यासाठी शेतकऱ्यांकडून आधार कार्ड बँक पासबुक व सातबारा उताऱ्यावरील पीक पेऱ्याची नोंद बघितली जाते. यानंतर 10 ते 12 दिवसात आम्हाला पेमेंट मिळतो त्यानंतर आम्ही ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करतो.

पिंपळगाव बाजार समितीमध्ये साडेचारशे ते सहाशे रुपये दरम्यान विक्री केला. या कांद्यातून उत्पादन खर्च तर दूरच शेतातून कांदा काढणी आणि वाहतुकीचा खर्च निघाला नाही. गेल्या दोन दिवसात लासलगाव येथील नाफेडच्या केंद्रावर चार ट्रॅक्टर मधून शंभर ते सव्वाशे क्विंटल कांदा विक्री केला असून या कांद्याला 870 ते 937 रुपये इतका बाजार भाव मिळाला आहे. बाजार समितीमध्ये विक्री केलेल्या कांद्याची रोख पैसे मिळतात. मात्र नाफेडच्या केंद्रावर विक्री केलेल्या कांद्याची पंधरा ते वीस दिवसांनी पैसे मिळत असल्याने समाधान व्यक्त करत कागदपत्रांची असलेली पूर्तता करण्यासाठी दमछाक होत असल्याने या सभेच्या बाजार समितीमध्ये कांदा खरेदीची परवानगी दिल्यास व्यापारी आणि एजन्सीमध्ये स्पर्धा होऊन यापेक्षाही दोन रुपये नक्कीच अधिक बाजार भाव मिळेल. 

COMMENTS