नाशिक : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी, कांदा हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे नगदी पीक आहे. जागतिक स्तरावरील उत्पादकता आणि भारतातील उत्पादकता पाहता
नाशिक : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी, कांदा हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे नगदी पीक आहे. जागतिक स्तरावरील उत्पादकता आणि भारतातील उत्पादकता पाहता मोठी तफावत दिसते. कांद्याच्या उत्पादनखर्चात झालेली वाढ, अवकाळी पाऊस व बाजारातील चढउतार यामुळे शेतकरी अधिकच हैराण झाला आहे. नावीन्यपर्ण कृषी तंत्राचा वापर करण्यासाठी पुढे येणे व त्याद्वारे खर्चात बचत करून उत्पादन व गुणवत्ता यांच्यात खात्रीने वाढ करणे हाच यातून सुटकेचा मार्ग आहे. अलीकडेच बाजारात आणलेले ‘महाधन क्रॉपटेक’ खत म्हणजे कांद्याचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहे ,गेल्या दोन हंगामापासून ज्या ज्या शेतकऱ्यांनी महाधन क्रॉपटेकचा वापर केला त्यांच्या कांद्याच्या उत्पादनात सरासरी १५ ते २०% ने वाढ दिसून आली आहे.
‘महाधन क्रॉपटेक हे कांद्याच्या पिकासाठी असलेले वैशिष्ट्यपूर्ण संपूर्ण पोषण समाधान आहे, ज्यातून कांद्याच्या पिकासाठी आवश्यक असलेले सर्व पोषक घटक जसे कि मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये पुरविली जातात. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील प्रगतिशील शेतकऱ्यांनी या खताला भरभरून दिलेला प्रतिसाद पाहता हे खत शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरल्याची प्रचिती येते.
‘महाधन क्रॉपटेक’ ही भारतातील अग्रणी खत उत्पादकांपैकी एक असून दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड (डीएफपीसीएल) ची सार्वजनिक मालकी असलेली कंपनी आहे, गेल्या तीन वर्षात सुमारे ४५० पेक्षाही अधिक घेतलेल्या चाचण्यांच्या माध्यमातून व ५००० पेक्षा जास्त प्रात्यक्षिकातून त्याची शेतकऱ्यांसाठीची उपयुक्तता निर्विवादपणे सिध्द्य झाली आहे.
कांद्याचे प्रगतीशील शेतकरी श्री. विलास शहाजी शेवाळे (गाव – टाकळी, ता.- अकोले, जि.- अहमदनगर) हे ‘महाधन क्रॉपटेकच्या’ वापरामुळे मिळालेल्या फायद्याला आनंदाने दुजोरा देताना म्हणतात की रब्बी हंगाम २०२२ मध्ये मी माझ्या शेतामध्ये कांदा पिकावर क्रॉपटेक खत वापरले. या खतामुळे मला मोठे आणि एकसमान आकाराचे कांदे मिळाले परिणामी मला एकरी २.५ टन उत्पादन जास्तीचे मिळाले. तसेच कांदा चाळीमध्ये जवळजवळ ६ ते ७ महिने चांगला टिकून राहिला, कांद्याची प्रत चांगली मिळाल्यामुळे बाजारभाव देखील खूप चांगला मिळाला”.
महाधन कंपनीचे चिफ ऑपेरेटींग ऑफीसर श्री. नरेश देशमुख, म्हणाले की “मला ही गोष्ठ सारखी मनाला बोचत होती की रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरामुळे भारतातील जमिनीचे आरोग्य मोठ्या प्रमाणात बिघडले असून तिचा सातत्याने ऱ्हास होत आहे व याला काही चांगला पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे फार आवश्यक आहे. याचाच परिपाक म्हणून महाधन या सारख्या लोकप्रिय खतकंपनीने या संदर्भात जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान भारतातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. शेतकऱ्यांनी काळाची गरज ओळखून अशा प्रकारच्या उत्पादन वापराकडे तातडीने वळले पाहिजे. म्हणूनच कांद्याच्या पिकाची उत्पादनक्षमता वाढविण्याबरोबरच निसर्गाला हानी न पोहोचवणारे उपाय उपयोगात आणण्याची तातडीची गरज आहे. यामुळे मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापराचा समतोल साधला जाईल”
COMMENTS