Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला मिळतोय जादा भाव

श्रीगोंदा ः तालुक्यातील पारगाव फाटा येथील चैतन्य कृषि उत्पन्न बाजार समिती खाजगी मध्ये दसर्‍या निमित्ताने झालेल्या कांदा लिलावात 5555 रुपये क्विंट

अहमदनगर : युनियन बॅंकेत 56 लाखांचा घोटाळा (Video)
शिर्डी लोकसभा निवडणुकीत मातंग समाज निर्णायक भूमिका घेणार ः जगधने
नाभिक समाज ट्रस्टतर्फे समाजमित्र, कार्यगौरव पुरस्कारांचे वितरण

श्रीगोंदा ः तालुक्यातील पारगाव फाटा येथील चैतन्य कृषि उत्पन्न बाजार समिती खाजगी मध्ये दसर्‍या निमित्ताने झालेल्या कांदा लिलावात 5555 रुपये क्विंटल भाव पुकारण्यात आला. सद्या कांदा भाव खात असून शेजारील तालुक्या पेक्षा चैतन्य कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये जादा भाव देण्यात येत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी चैतन्य बाजार समितीमध्ये कांदा विक्रीस आणताना दिसत आहेत.महानगर मधील बाजारपेठ प्रमाणे बाजारभाव आणि कांदा लिलाव नंतर त्वरित पट्टी मिळत असल्याने खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.
कांद्याचे आगार असलेल्या श्रीगोंदा तालुक्यात कांदा उत्पादक शेतकर्‍यांना रास्त भाव मिळत नसल्याने शेतकरी बाहेर राज्यात किंवा बाहेरील व्यापार्‍यांना कांदा देत असे यातून अनेकदा फसवणूक होत असल्याने वृढेश्‍वर अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी चेअरमन विठ्ठलराव वाडगे यांनी 4 वर्षापूर्वी नगर-दौंड राजमार्ग वरील पारगाव फाटा येथे मॉडेल ऑक्ट अंतर्गत चैतन्य कृषि उत्पन्न बाजार समिती सुरू केली .स्थापनेचा उद्देश हा महा नगर धर्तीवर बाजारभाव,मालाचे वजन,लिलाव नंतर त्वरित पट्टी असल्याने कांदा उत्पादक शेतकरी चैतन्य कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये कांदा विक्रीस आणू लागले. येथे दर मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी लिलाव होतात. काल दासर्‍या निमित्ताने भल्या पहाटे पासून शेतकरी  कांदा विक्रीस आणताना दिसत होते दुपारी लिलाव वेळी उत्साहात लिलाव पुकारण्यात आले नंबर 1 कांद्याचे काही वक्कल 5555 रुपये भाव व्यापार्‍यांनी पुकारला तसेच मोठा कांदा  4500 ते 5200, मध्यम  4000 ते 4500, गोल्टा 3500 ते 4000, गोल्टी 3000 ते 3500 भाव पुकारण्यात आले. सुमारे 14 हजार गोण्यांची आवक झाल्याचे चैतन्य कृषि उत्पन्न बाजार समिती व्यवस्थापक शिवाजी भोस यांनी सांगितले.

कांदा उत्पादक शेतकर्‍यांमध्ये चैतन्य – श्रीगोंदा तालुका कांद्याचे आगार म्हणून ओळखला जातो. पण कांदा उत्पादक शेतकर्‍यांना कधी न्याय मिळाला नाही त्यांच्या प्रश्‍नावर कोणीच बोलत नसताना सामाजिक बांधिलकी तून वृद्धेश्‍वर अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी चेअरमन विठ्ठलराव वाडगे यांनी चैतन्य कृषि उत्पन्न बाजार समिती माध्यमातून कांदा भावाबरोबरच पट्टी त्वरित देऊन कांदा उत्पादक शेतकर्‍यांमध्ये चैतन्य निर्माण केले. येथील सोयी सुविधा आणि पट्टी त्वरित मिळत असल्याने भुसार, कडधान्य बाजारास देखील प्रतिसाद मिळत आहे.

COMMENTS