कोपरगाव / प्रतिनिधी ः शेतकर्यांच्या जिव्हाळ्याच्या आणि हिताच्या दृष्टीने सरकारने कांदा निर्यातीवर लावलेल्या 40 टक्के शुल्क निर्णयाचा फेरविचार व्
कोपरगाव / प्रतिनिधी ः शेतकर्यांच्या जिव्हाळ्याच्या आणि हिताच्या दृष्टीने सरकारने कांदा निर्यातीवर लावलेल्या 40 टक्के शुल्क निर्णयाचा फेरविचार व्हावा. शेतकर्यांना परवडेल आणि कांदा खाणार्यांनाही माफक दरात कसा कांदा उपलब्ध होईल. याचा मध्य साधण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु असुन केंद्र सरकार लवकरच फेरविचार करेल. अशी अपेक्षा आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केली.
माजी आ. अशोकराव काळे आणि आ. आशुतोष काळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तालुक्यातील शिरसगाव येथे प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ आणि श्री.जनार्दन स्वामी रुग्णालयाच्या वतीने आयोजित सर्वरोग निदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुष्पा काळे होत्या.पुढे बोलताना काळे म्हणाले,ग्रामीण भागात कष्टकरी शेतकरी परिस्थितीमुळे आजारपण अंगावर काढतात.विशेषतः महिला आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात.त्याच उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असुन,या माध्यमातुन गरज पडल्यास मोफत शस्त्रक्रिया दिली जाणार आहे.तरी याचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी पुष्पा काळे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. आरोग्य शिबिरासाठी श्री.जनार्दन स्वामी रुग्णालयाची डॉक्टर,पंचक्रोशीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारभारी आगवण यांनी केले सुत्रसंचालन राहुल गायकवाड यांनी तर अप्पासाहेब निकम यांनी आभार मानले.
चौकटः पाण्याचा वापर काटकसरीने करावा
-यावर्षी राज्यात पाऊस नसल्यामुळे शासनस्तरावर उपाययोजनेचा आढावा सुरु असुन,सध्या धरणेही भरले नसल्यामुळे पाटपाणीदेखील पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित होईल. अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे भविष्यात पाण्याचा वापर सर्वांनाच काटकसरीने करावा लागेल.
COMMENTS