नवी दिल्ली ः लोकसभा निवडणुकीत महायुतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, महाविकास आघाडीचे उमेदवार मात्र निवडून आले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री ए

नवी दिल्ली ः लोकसभा निवडणुकीत महायुतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, महाविकास आघाडीचे उमेदवार मात्र निवडून आले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा, कापूस आणि सोयाबीनचा आम्हाला लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचे सांगितले. शेती, पीक किमान आधारभूत किंमत निश्चितीसाठी केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
लोकसभा निवडणुकीत कांदा निर्यातीचा प्रश्नांने शेतकर्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. याच प्रश्नांचे विरोधकांनी भांडवल केले. यासंदर्भात बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीत नाशिक भागात कांद्याने रडवले. तर, सोयाबीन आणि कापसाने आम्हाला त्रास दिला. त्यामुळे आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत फटका बसल्याची कबुली मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. राज्यामध्ये सत्तेत असताना सुद्धा महायुतीला लोकसभा निवडणुकीत हवे तसे यश मिळवता आले नाही. निवडणुकीत कोणत्या कारणांमुळे जागा कमी झाल्या याचे विचारमंथन महायुतीतील पक्ष करत आहेत. कोणत्या मुद्द्यांमुळे फटका बसला याची माहिती मतदारसंघानिहाय घेतली जात आहे.
महायुतीला लोकसभेत संविधान बदलाच्या मुद्द्यासह कापूस, सोयाबीन आणि कांद्यांचा फटका बसल्याचे सांगितले जात आहे. असह्याद्री बंगल्यावर झालेल्या शेती पीक किमान आधारभूत किंमत निश्चितीसाठी केंद्रीय कृषी मूल्य आयोगाची बैठक झाली. त्यात खुद्द मुख्यमंत्री शिंदेंनी त्याची कबुली दिली. सोयाबीन आणि कापसा करता साडेचार हजार कोटी रुपयांची तरतूद केली पण आंचार संहितेत अडकली. दरम्यान सोयाबीन, कापूस आणि कांद्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणे झाले आहे काही ठोस निर्णय घेणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले.
COMMENTS