मुंबई ः केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले असून, राज्यातील कांद्याचे सर्व लिलाव बंद झाले आहेत. निर
मुंबई ः केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले असून, राज्यातील कांद्याचे सर्व लिलाव बंद झाले आहेत. निर्यातीस पाठवण्यात येणारे तब्बल 170 कंटेनर मुंबईत अडकून पडले आहे. यामुळे हा कांदा सडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारने 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यातबंदी केली आहे. यामुळे शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. सरकारच्या या निर्णयानंतर कांदा उत्पादक संकटात सापडले असून त्यांनी नाशिकच्या लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यात कांदा लिलाव बंद केले या बंदीचा आजचा तिसरा दिवस आहे.
सर्व कांदा जागेवरच पडून असल्याने चांगला कांदा सडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. लिलावबंदी असल्याने शेतकरी देखील हवालदिल झाले आहेत. या वर लवकर तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, निर्यातीला पाठवण्यात आलेल्या 170 कंटेनर कांदा हा मुंबईत बंदरावर अडकून पडला आहे. हा देखील खराब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारच्या या निर्णया विरोधात अनेक ठिकाणी आंदोलने देखील सुरू आहे. नाशिकच्या उमराणे येथे कांदा उत्पादक शेतकर्यांनी मुंबई-आग्रा महामार्ग रोखला, कांदा निर्यात बंदीमुळे कांद्याचे दर घटण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी केल्याने बांग्लादेशात निर्यात होणार्या कांद्याचे तब्बल 200 ट्रक परत बोलावण्यात आहे. हे ट्रक सीमेवरून परत माघारी येत आहेत. यातील 80 ट्रक हे एकट्या नाशिक जिल्ह्यातील आहेत तर इतर ट्रक हे मध्यप्रदेश आणि कर्नाटकातील आहेत. कांद्याच्या निर्यातीवर तात्काळ बंदी घालण्याच्या केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे.
कांदा प्रश्नी उपमुख्यमंत्री फडणवीस थेट केंद्र दरबारी- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांद्याच्या प्रश्नावर केंद्रीय पीयुष गोयल यांची भेट घेतली. यावेळी केंद्र सरकार लवकरच कांदा उत्पादक शेतकर्यांसाठी सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन पीयुष गोयल यांनी फडणवीसांना दिले आहे. कांदा निर्यातबंदीनंतर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकर्यांच्या समस्यांचे गोयल यांना भेटून निवेदन दिले. सह्याद्री अतिथीगृहावर पियुष गोयल आणि फडणवीस यांची भेट झाली.फडणवीसांनी स्वत: ही माहिती दिली आहे.फडणवीस शेतकरी बांधवांचे महत्त्वाचे प्रश्न कांदा, कापूस व सोयाबीन या विषयांवर केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्यासह एक सकारात्मक बैठक सह्याद्री अतिथी गृह मुंबई येथे झाली. पियुष गोयल यांनी शेतकरी हिताचे सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन या बैठकीत दिले.
कांदा प्रश्नावर आज राजधानीत बैठक – कांदा प्रश्नावर आज सोमवारी दिल्लीत महत्त्वाची बैठक आहे. मंत्री पीयुष गोयल यांच्यासोबत होणार बैठक होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नाशिकमधील व्यापारी बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. केंद्राने कांदा निर्यात बंदी केल्याने जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद आहेत. यामुळे राज्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. ठिकठिकाणी रस्ता रोको, आंदोलने केली जात आहेत. तर तातडीने ही कांदा निर्यात हटवण्याची मागणी शेतकरी करत आहेत. त्यामुळे दिल्लीत होणार्या बैठकीत काय तोडगा निघतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
COMMENTS