Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भंडारदरा परिसरात स्वातंत्र्यदिनानिमित्त एकेरी वाहतूक

अकोले ः अकोले तालुक्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ असणार्‍या भंडारदरा धरणावर स्वातंत्र्य दिनाच्या पार्शवभूमी वर होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेता

बेलापूर महाविद्यालयात कॅम्पस प्लेसमेंट उत्साहात
तिरुपतीला पाच किलो सोन्याची तलवार अर्पण DAINIK LOKMNTHAN
राज्यात ८ ते १२ मार्च दरम्यान महिला दिन सप्ताह : मंत्री प्रा.वर्षा गायकवाड

अकोले ः अकोले तालुक्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ असणार्‍या भंडारदरा धरणावर स्वातंत्र्य दिनाच्या पार्शवभूमी वर होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेता पर्यटन पंढरी असणार्‍या भंडारदरा परिसरात पोलिस प्रशासनाने एकेरी वाहतूक केली आहे. भंडारदर्‍याला पर्यटनाला येणार्‍या पर्यटकांनी एकेरी वाहतुकीच्या मार्गाचा अवलंब करावा असे आव्हान राजूर पोलिसांनी केले आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा या पर्यटन स्थळाला  दरवर्षी हजारो पर्यटक पावसाळ्यात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतात. विशेषतः 15 ऑगस्ट या दिवशी  पर्यटकांची मोठी गर्दी होते. यामुळे ही गर्दी नियंत्रणात आणणे प्रशासनाला मोठे  जिकरीचे असते  यासाठी या उपाय योजना कराव्या लागतात. पर्यटन पंढरीमध्ये पर्यटन क्षेत्रामध्ये भंडारदरा धरण, कळसुबाई शिखर, आशिया खंडातील सर्वात खोलदरी सांदणदरी, रतनवाडीचे अमृतेश्‍वर मंदिर, रंधा धबधबा, वसुंधरा फॉल, नान्ही फॉल, बाहुबली धबधबा , नेकलेस फॉल, घाटघर येथील कोकणकडा असे प्रेक्षणीय स्थळे आहेत.

असा आहे वाहतुकीचा मार्ग – रंधा धबधबा येथून भंडारदरा धरणाकडे जाण्यास प्रतिबंध करण्यात आला असून भंडारदर्याला वाकी फाटा/वारंगघुशी फाटा, चिचोंडी फाटा, हॉटेल यश, शेंडी, भंडारदरा धरण असा मार्ग राजूर भागातून जाणार्‍या पर्यटकांसाठी राहणार असून नासिक मुंबईकडून येणार्‍या पर्यटकांसाठी वारंघुशी फाटा, चिचोंडी, हॉटेल यश, शेंडी, भंडारदरा धरण असा असणारा असून रंधा धबधबा  मार्गे पर्यटकांना बाहेर पडता येणार आहे . एकेरी वाहतुकीचा मार्ग हा फक्त स्वातंत्र्य दिनी अवलंबण्यात येणार असल्याची माहिती राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक सरोदे यांनी दिली आहे. 

COMMENTS