Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोर्टात विरोधात निकाल गेल्याच्या कारणावरून एकास मारहाण

अहमदनगर : न्यायालयात जागेचा निकाल विरोधात लागल्याच्या रागातून दोघांनी एकास रस्त्यात अडवून निकालाच्या कारणावरून लई माजलास का असे म्हणून चाकूने व द

घरीच थांबा, तुम्हा शिवभक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी रायगडावर जाईन’ संभाजीराजेंचं आवाहनl पहा LokNews24
श्री साईबाबांच्या मूर्तीची आज प्राणप्रतिष्ठापना
पाकिस्तानचे वादळ नगरपर्यंत पोहोचले ?

अहमदनगर : न्यायालयात जागेचा निकाल विरोधात लागल्याच्या रागातून दोघांनी एकास रस्त्यात अडवून निकालाच्या कारणावरून लई माजलास का असे म्हणून चाकूने व दांडक्याने मारहाण केल्याची घटना माळीवाडा बस स्टँड समोरील उज्वल कॉम्पलेक्स बिल्डींग जवळ घडली. 

या बाबतची माहिती अशी की झिशान रईस शेख, (वय-28 वर्षे,रा.गुलशन कॉम्प्लेक्स,हाजी इब्राहिम कॉलनी, बुरुडगाव रोड, अहमदनगर) हे माळीवाडा बस स्टँड समोरील उज्वल कॉम्प्लेक्स बिल्डींग जवळुन घरी जात असताना झहीर इक्राम सय्यद (रा.हाजी इब्राहिम कॉलनी, बुरुडगाव रोड, अहमदनगर) व झहीर फय्याज शेख (रा.रामचंद्र खुंट, शादुवाल, झेंडीगेट, अहमदनगर) या दोघांनी एकट्याला पाहुन रोडवर थांबविले व म्हणाले की, आपला कोर्टात चाललेला सिव्हील दाव्याचा निकाल तुमच्या बाजुने लागला म्हणुन तुम्ही लय हवेत जाऊ नका असे म्हणाले असता त्यावर झिशान त्यांना म्हणाले की कोर्टाने दिलेल्या निकालाप्रमाणे आमच्या ताब्यात असलेल्या जागेवर आता तुम्ही येऊ नका. असे त्याला म्हणाल्याचा राग मनात धरुन झहीर इक्राम सय्यद याने त्याचे कमरेला खोचलेला चाकु बाहेर काढुन झिशानच्या दिशेने फिरवला तो त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला लागल्याने जखम झाली. त्यानंतर लगेचच झहीर फय्याज शेख याने त्याच्या हातातील लाकडी दांडके डाव्या हाताच्या दंडावर मारुन जखमी केले. मी तेथुन पळुन जात असताना यापुढे जर आमच्या नादी लागला तर जिवे ठार मारुन टाकीन असे म्हणुन वाईट वाईट शिवीगाळ केली. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी झिशान शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दोघाविरुध्द गुन्ह्याची नोंद केली.

COMMENTS