Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इंदापूरात गोळी झाडून एकाची हत्या

इंदापूर ः इंदापूर शहरात जेवण करण्यास गेलेल्या तरुणाचा गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आलाय. अचानक गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. इंदापूर श

चोपडा तालुक्यात वीज पडून शेतात दहा मेंढ्या च्या मृत्यू 16 वर्षाचा मुलगा जखमी.
मराठवाडा भूकंपांच्या धक्कयाने हादरला
टँकरने 2 शाळकरी मुलींना चिरडले

इंदापूर ः इंदापूर शहरात जेवण करण्यास गेलेल्या तरुणाचा गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आलाय. अचानक गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. इंदापूर शहरातील जगदंबा हॉटेलमध्ये (दि.16) रात्री ही घटना घडली. अविनाश धनवे असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून तो पुण्यातील आळंदी परिसरातील राहिवासी आहे. पिंपरी-चिंचवड येथील तरुण हा आपल्या मित्रांसोबत जेवण करण्यासाठी इंदापूर येथे हॉटेल जगदंब येथे थांबला असता, काही अज्ञात हल्लेखोरांनी पाठीमागून येत खुर्चीत बसलेल्या तरुणाच्या डोक्यात पिस्तुलातून गोळी झाडून आणि कोयत्याने वार करत हत्या केली. या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले आहे.

COMMENTS