Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवले पुलावरील अपघातात एकाचा मृत्यू

पुणे : पुण्यात नवले पुलावर अपघाताची मालिका ही सुरूच आहे. कात्रज देहू बाह्यमार्गावर कात्रज चौकाकडून येणार्‍या सिमेंटने भरलेल्या एका ट्रकने नवले पु

अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले ‘एकनाथ’ .
पंचमहालमध्ये जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली
अज्ञात वाहनाच्या धडकेने दोघांचा मृत्यू

पुणे : पुण्यात नवले पुलावर अपघाताची मालिका ही सुरूच आहे. कात्रज देहू बाह्यमार्गावर कात्रज चौकाकडून येणार्‍या सिमेंटने भरलेल्या एका ट्रकने नवले पुलाजवळ चौकात सिग्नलला उभ्या असणार्‍या चार ते पाच चारचाकी व दुचाकी वाहनांना भरधाव वेगात येऊन धडक दिली. या विचित्र अपघातात एक जण ठार झाला आहे. तर अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. ही घटना आज सकाळी 10 च्या सुमारास घडली. संदेश बानदा खेडेकर (वय 34, रा. टिळेकर नगर, इस्कॉन मंदिराजवळ, कात्रज – कोंढवा रस्ता, पुणे) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कात्रज कडून नवले पूलाकडे सीमेंटचा ट्रक (के. ए. 56-3165) भरधाव वेगात आला. यावेळी येथे सिग्नललागला होता. या ठिकाणी उभ्या असलेल्या चार ते पाच चारचाकी वाहनांना आणि दुचाकीला जोरधार धडक दिली. यात दुचाकी चालक ठार झाला.

COMMENTS