Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर-मनमाड महामार्गावरील अपघातात एकाचा मृत्यू

देवळाली प्रवरा ः राहुरी फॅक्टरी येथे नगर-मनमाड महामार्गावरील वाणी ओढा येथील हॉटेल ताईसाहेबसमोर चारचाकी वाहन व दुचाकीचा अपघात होऊन दुचाकी स्वाराचा

भरधाव रेल्वे इंजिन आणि ट्रकची धडक .
केज-बीड रोडवर मस्साजोग येथे जीप दुचाकीचा भीषण अपघात अपघातात एक ठार तर एक जण गंभीर जखमी
अमरावतीमध्ये भीषण अपघातात 6 ठार !

देवळाली प्रवरा ः राहुरी फॅक्टरी येथे नगर-मनमाड महामार्गावरील वाणी ओढा येथील हॉटेल ताईसाहेबसमोर चारचाकी वाहन व दुचाकीचा अपघात होऊन दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. गुहा येथील शंकर साहेबराव खपके असे मृत व्यक्तिचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,बुधवारी  सकाळी 11 वाजता शिर्डीहून नगरच्या दिशेने जात असलेल्या चारचाकी वाहन एम एच .15 एफ व्ही. 3350 ने दुचाकिस पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकी स्वार हा रस्त्याच्या विरुद्ध बाजूला उडून पडला.त्याचवेळी शिर्डीकडे  ऊस तोडणी कामगार घेऊन जात असलेल्या टक्ट्ररखाली सापडला गेल्याने  शंकर साहेबराव खपके (वय 55 वर्षे रा.गुहा) हे जागीच ठार झाले. दरम्यान अपघातस्थळी परिसरातील तरुण मंडळींनी तातडीने मदतकार्य केले. तर रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या मदतीने मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. अपघातस्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. घटनास्थळी सहायक पोलिस उपनिरीक्षक तुळशिदास गीते यांनी पंचनामा केला. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलिस करीत आहे.

COMMENTS