पुणे/प्रतिनिधी ः पुण्यातील कोंढवा बुद्रुक परिसरात स्मशानभूमी जवळ गुरवारी सकाळी चार ते पाच वाहनाचा विचित्र अपघात झाला असून या अपघातात एक जण जागीच

पुणे/प्रतिनिधी ः पुण्यातील कोंढवा बुद्रुक परिसरात स्मशानभूमी जवळ गुरवारी सकाळी चार ते पाच वाहनाचा विचित्र अपघात झाला असून या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे. तर अनेकजन या भीषण अपघातात जखमी झाले आहेत. यामध्ये एका शाळेच्या बसचा देखील अपघात झाला आहे. यामुळे गुरवारी सकाळ पासून मोठी वाहतूक कोंडी झालेली पाहावयला मिळत आहे.
कात्रज कोंढवा खडीमशिन रोडवर गुरवारी सकाळच्या सुमारास संबधित विचित्र अपघात झालं आहे. यात ट्रक, टेम्पो, जीप, स्कूल व्हॅन या वाहनांनी एकमेकांना धडक दिली आहे. या अपघातात एका जणाचा जागीच मृत्यू झाला आहे, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. मागील काही दिवसांपासून कात्रज कोंढवा रोड हा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. मागील अनेक वर्षापासून या रस्त्यावर सातत्याने अपघातच सत्र हे सुरच असून प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात नाही. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचे दिसून येत आहे. या अपघाताची माहिती मिळताच, कोंढवा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी क्रेनच्या साह्याने सदर वाहने बाजूला करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे सदर भागातील वाहतूक कोंडी सोडवून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.
COMMENTS