Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सणसवाडीत कंपनीची भिंत कोसळून एकाचा मृत्यू

पुणे ः पुणे जिल्ह्यातील सणसवाडी औद्योगिक परिसरात एका कंपनीची भिंत कोसळून एक जण ठार तर चार ते पाच जण गंभीर जखमी झाल्याची भीषण घटना घडली आहे. ही धक

देहरे परिसरात अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न
धारूर घाटात ट्रकचा अपघात
अभिनेत्री प्रीती झिंटाने चुलीवर बनवलं जेवण

पुणे ः पुणे जिल्ह्यातील सणसवाडी औद्योगिक परिसरात एका कंपनीची भिंत कोसळून एक जण ठार तर चार ते पाच जण गंभीर जखमी झाल्याची भीषण घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना येथील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. यामुळे येथे उभ्या असलेल्या अनेक वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. यात सात ते आठ दुचाकी आणि दोन चारचाकी गाड्यांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
भिंत कोसळून एक दुर्दैवी घटना घडली या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला तर पाच ते सहा जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. पुणे एमआयडीसी येथील सणसवाडी इथे असलेल्या एका औद्योगिक कंपनीमध्ये ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये दोन फोर व्हीलर सह अनेक दुचाकी यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच बचाव कार्यासाठी प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहेत. यातील जखमींवर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच आमदार अशोक पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे.

COMMENTS