Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना; एक ताब्यात

 पाथर्डी : शहरातील कसबापेठ परिसरात बुधवारी (दि. १८) मध्यरात्री दारूच्या नशेत सिमेंट ब्लॉक फेकून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्या

जागतिक विकासासाठी गांधी विचारांची गरज – प्रा. डॉ. सलमान अली मिर्झा
पाथर्डीत शिवजयंती उत्साहात ; विविध उपक्रमांचे आयोजन
जिल्हाधिकाऱ्यांचे धडक कारवाईमुळे पाथर्डीतील सहा दुकानाला लागले सील

 पाथर्डी : शहरातील कसबापेठ परिसरात बुधवारी (दि. १८) मध्यरात्री दारूच्या नशेत सिमेंट ब्लॉक फेकून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची गंभीर घटना घडली. दरम्यान या घटनेचे गांभीर्य ओळखून पाथर्डी पोलिसांनी अवघ्या तीन तासांत एकाला ताब्यात घेतले आहे.

 याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीहरी भास्कर बोरुडे (वय ३५, रा. कसबापेठ, पाथर्डी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,रात्री सुमारास कुटुंबासह घरी असताना दगड फेकल्याचा आवाज आला.बाहेर येऊन पाहिले असता विनोद श्रीधर कोकाटे (रा. कोकाटे वस्ती, खेर्डा रोड, पाथर्डी) हा दारूच्या नशेत घराशेजारील पुतळ्यावर सिमेंट ब्लॉक फेकताना दिसला. आवाज दिल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. घटनास्थळी पाहणी केली असता पुतळ्याला आघात झाल्याचे स्पष्ट दिसून आले. या प्रकारामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांनी तत्काळ एकत्र येत आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली व पोलिसांना माहिती देण्यात आली.

 माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विलास पुजारी, पोलिस उपनिरीक्षक विलास जाधव तसेच गुप्तवार्ता विभागाचे नागेश वाघ यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत कोकाटे याला घराजवळील उसाच्या शेतातून मध्यरात्रीच ताब्यात घेतले.दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या घटनेचा निषेध व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

COMMENTS