Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेततळ्यामध्ये पाय घसरून एकाचा मृत्यू

राहाता प्रतिनिधी ः राहाता येथील अस्तगाव रोड लागत असलेल्या गाडेकर यांच्या शेततळ्यामध्ये रवींद्र जेजुरकर हा तरुण घरा जवळ असलेल्या शेततळ्याजवळ फिरत

संभाजी महाराज जयंतीनिमित्त सावेडी उपनगरातील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी
*सार्वजनिक बांधकाम खात्यात अनियमिनीती; निधी पेक्षा जास्त खर्च l पहा LokNews24*
वाचन संस्कृतीतर्फे माऊली वाचनालयास कपाटभर पुस्तके भेट

राहाता प्रतिनिधी ः राहाता येथील अस्तगाव रोड लागत असलेल्या गाडेकर यांच्या शेततळ्यामध्ये रवींद्र जेजुरकर हा तरुण घरा जवळ असलेल्या शेततळ्याजवळ फिरत असताना त्याचा पाय घसरून शेततळ्यामध्ये पडल्याची घटना सकाळी 11:00 वाजण्याच्या सुमारास घडली असून यामध्ये रवींद्र जेजुरकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
जेजुरकर याचा मृतदेह करण्यासाठी शिर्डी नगरपालिका तसेच राहाता नगरपालिका अग्निशमन, दल राहाता पोलीस स्टेशन यांच्या अथक प्रयत्नानंतर शेततळ्यातून सदर तरुणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. शासकीय रुग्णलयात उत्तरक्रिये साठी पाठवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास राहाता पोलीस स्टेशन करत आहे. तर यावेळी राहाता पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोपान काकड, ठाणे अंमलदार शिरसाट, राहाता नगरपालिकेचे प्रमुख अशोक साठे, फायरमन विकी साळवे, अमोल बनसोड, ऋषिकेश सदाफळ तर शिर्डी नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित मदतकार्य करण्यासाठी उपस्थित होते.

COMMENTS