Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लिंगाणा किल्ल्यावरून कोसळून एकाचा मृत्यू

पुणे ः कोकणातील प्रसिद्ध लिंगाणा किल्ल्यावरती ट्रेकिंग करण्यासाठी आलेल्या ग्रूपमधील पर्यटक खोल दरीत कोसळल्याची घटना सोमवारी रात्री घडली. यामध्ये

हायवेवर पक्षाला वाचवण्यासाठी थांबले अन् टॅक्सीन थेट उडवूनच लावलं | LOK News 24
नाशिक विभागातील मान्सूनपूर्व तयारीचा आज मुख्यमंत्र्यांकडून आढावा
शेतकऱ्यांवर पुन्हा लाठीचार्ज ; रविकांत तुपकरांची आक्रमक भूमिका

पुणे ः कोकणातील प्रसिद्ध लिंगाणा किल्ल्यावरती ट्रेकिंग करण्यासाठी आलेल्या ग्रूपमधील पर्यटक खोल दरीत कोसळल्याची घटना सोमवारी रात्री घडली. यामध्ये एकाचा दरीत पडून मृत्यू झाला आहे. मुंबईतील पनवेलमधून हा ग्रूप ट्रेकींगसाठी आला होता. अजय काळे (वय वर्ष- 62 ) असे मृत पर्यटकाचे नाव आहे. पनवेलमधून आलेल्या या ग्रूपमधील अनुभवी असणारे अजय काळे यांना चक्कर आली व ते दरीत कोसळले. 400 फूट खोल दरीत कोसळल्याने त्यांना जबर मार लागला. बचाव पथकाने शोध घेतला असता त्यांचा मृतदेह सापडल्याचे समोर आले आहे. किल्ले लिंगाणा हा कोकणातील रायगड जिल्ह्याच्या सीमावर्ती हद्दीत आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातून सिंगापूर मार्गे सोईस्कर मार्ग आहे. स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल येथील एक ट्रेकरचा ग्रुप ट्रेकिंगसाठी लिंगणा किल्ला पायथ्याशी आला असता, ट्रेकिंग दरम्यान या ग्रुप मधील अनुभवी ट्रेकर्स असणारे अजय काळे हे ट्रेकिंग दरम्यान अचानक चक्कर येऊन खोल दरीत कोसळले. 400 फूट खोल दरीत कोसळल्याने त्यांना मोठा मार शरीरावर लागला. या घटनेनंतर बचाव पथकाचे गिर्यारोहक यांनी तरी उतरून काळे यांचा शोध घेतला. मात्र, मोठ्या उंचीवरून पडल्याने काळे यांच्या शरीराला जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे दिसून आले. यानंतर दोरीच्या साह्याने त्यांचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस आणि गिर्यारोहक संस्थेचे सदस्य यांनी घटनास्थळी धाव घेत मदतीसाठी प्रयत्न केले. अचानकरीत्या अशा प्रकारे ट्रॅकरचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ट्रेकिंगला जाताना पर्यटकांनी पुरेशी काळजी घ्यावी तसेच अज्ञात ठिकाणी एकट्याने न फिरता ग्रुप सोबत राहावे असे आवाहन स्थानिक पोलिसांनी पर्यटकांना केले आहे.

COMMENTS