Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केज-बीड रोडवर मस्साजोग येथे जीप दुचाकीचा भीषण अपघात अपघातात एक ठार तर एक जण गंभीर जखमी

केज प्रतिनिधी - केज तालुक्यातील मस्साजोग येथे हॉटेल विराज समोर मोटर सायकल व महिंद्रा बोलेरो जीपचा भीषण अपघात होऊन एक जागीच ठार झाला आहे तर एकाची

कर्जत महामार्गावर दुचाकींचा अपघात
अहमदनगरच्या राहता तालुक्यात ट्रकचा भीषण अपघात
रावणाचं दहन करताना झाला मोठा अपघात

केज प्रतिनिधी – केज तालुक्यातील मस्साजोग येथे हॉटेल विराज समोर मोटर सायकल व महिंद्रा बोलेरो जीपचा भीषण अपघात होऊन एक जागीच ठार झाला आहे तर एकाची प्रकृती नाजूक आहे. सदरील घटना दुपारी 1-00 वाजण्याच्या सुमारास मसाजोग पासून काही अंतरावर हॉटेल विराज समोर घडली आहे.
या घटनेमध्ये मोटर सायकल हिरो एम.एच. 24 ए.यु.8737 आणी महिंद्रा बोलेरो एम.एच .20 इ वाय 3340 या क्रमांकाची आहे. याबाबतची प्राथमिक मिळालेली माहिती अशी की,मोटर सायकलस्वार ओव्हरटेक करतअसताना भरधाव आलेल्या बोलोरो गाडीला समोरा समोर धडक झाल्याने परंडा तालुक्यातील एका शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव गेला आहे तर एकाची प्रकृती नाजूक असल्याचे समजते आहे. रविवार असल्यामुळे शाळकरी मुलाना सुट्टी असल्या कारणाने कपिलधार येथे जात असल्याचे समजले आहे. यातील सर्व विद्यार्थी हे लातूर येथील कॉलेजमध्ये शिक्षण घेत असल्याचे समजले आहे.सदरील घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केज पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी वाघमारे व श़ेख हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.108 क्रमांका वर कॉल करून आरोग्य विभागाच्या म्बुलन्सला पाचारण करून सदरील जखमीस उपजिल्हा रुग्णालय केज येथे प्राथमिक उपचारा साठी पाठवण्यात आले. केज स्टेशनच्या पोलीस कर्मचारी यांच्या दक्षतेमुळे एका जखमी व्यक्तीचेप्राण वाचले तर मृत झालेली डेडबॉडी उत्तरीयतपासणी साठी उपजिल्हा रुग्णालय येथे केज हलवण्यात आली.यावेळी रोडवर नागरिकांची खूप मोठी गर्दी व वाहनांची ट्राफिक झाली होती.सदरील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शना खाली केज पोलीस करत आहेत.

COMMENTS