Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इलेक्ट्रिक पोलवर काम करताना शॉक लागून एकाचा  मृत्यू  एक जखमी 

अहमदनगर/प्रतिनिधी - लाईटचे काम करत असताना ठेकेदार व विदयुत महामंडळाचे अधिकारी व वायरमन यांचे हायगयीने, हलगर्जीपणामुळे इलेक्ट्रीक पोलवर काम करी

तारेचा शॉक लागून बैलजोडीचा दुर्दैवी मृत्यू
गणेश विसर्जन करताना 11 जणांना बसला विजेचा शॉक
डिजेच्या तालावर नाचताना विजेचा शॉक लागून दुर्देवी मृत्यू.

अहमदनगर/प्रतिनिधी – लाईटचे काम करत असताना ठेकेदार व विदयुत महामंडळाचे अधिकारी व वायरमन यांचे हायगयीने, हलगर्जीपणामुळे इलेक्ट्रीक पोलवर काम करीत असताना अचानक लाईटचा पुरवठा सुरु झाल्याने पोलवर काम दोघांना इलेक्ट्रीक शॉक लागल्याने ते जमीनीवर पडुन गंभीर जखमी झाले. त्यात एकाचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला ही घटना  केडगाव येथील हॉटेल निशा पॅलेस पाठीमागील चौधरी मळा येथे घडली. या बाबतची माहिती अशी कि 

 अक्षय शांतवन ऊर्फ पोपट पाटोळे ( राहणार डोंगरगण ता.नगर ) हा ठेकेदार अमित आजिनाथ थोरात, ( रा.माळीवाडा,अ.नगर ) याचेकडे बरेच दिवसापासुन लाईटचे पोल उभे करण्यांचे काम करतो. दि 1 रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास अक्षय व त्याचा मित्र सोमनाथ दामु भांबळ, ( रा.डोगंरगण ता. जि.अ.नगर ) असे दोघेजण ठेकेदार अमित आजिनाथ थोरात,( रा. माळीवाडा, अहमदनगर ) यांचे साईटवर निशा हॉटेल पाठीमागे, चौधरी मळा, केडगाव, अ. नगर येथील लाईटचे काम करण्यासाठी गेले होते. सकाळी अकरा  वाजेच्या सुमारास साईटवर लाईटचे पोलचे काम करत असताना त्यांना अचानक ईलेक्ट्रीक शॉक लागून जखमी झाले आहे. ईलेक्ट्रीक शॉक लागुन त्याचे चेहरा, पाठीवर, हात व कान नाकातून रक्त येत होते. दोघांना औषधो  पचाराकरिता  आनंदऋषी हॉस्पीटल,येथेअँडमिट केले असता  डॉक्टरांनी तपासुन  अक्षय शांतवन ऊर्फ पोपट पाटोळे,  यास मयत घोषित केले अक्षय यांचेसोबत काम करणारा  सोमनाथ दामु भांबळ,( रा. डोगंरगण ता. अ. नगर ) यास देखील इलेक्ट्रीक शॉकमुळे जखमी होवुन त्यास पॅसिफिक हॉस्पीटल, अ.नगर येथे औषधोपचार कामी ऍडमिट केलेअसून त्याच्यावर उपचार सुरु आहे  

    या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी अरुण शांतवन उर्फ पोपट पाटोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ठेकेदार ,महराष्ट्र राज्य विद्यत वितरणचे अधिकारी व वायरमन यांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलीस हवालदार ईखे  करीत आहेत.

COMMENTS