Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगणक अभियंत्याची एक कोटींची फसवणूक

पुणे : पुण्यात सायबर क्राईमच्या घटनांत वाढ झाली असतांनाच शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी संगणक अभियंत्याची एक कोटी 15 लाख रुप

वीज पुरवठा खंडित करण्याच्या बहाण्याने साडेसात लाखांची फसवणूक
पुण्यात गुंतवणुकीच्या आमिषाने 38 लाखांची फसवणूक
पोलिसांच्या 2 पेट्रोल पंपावर 20 लाखाची फसवणूक

पुणे : पुण्यात सायबर क्राईमच्या घटनांत वाढ झाली असतांनाच शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी संगणक अभियंत्याची एक कोटी 15 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका 45 वर्षीय तक्रारदाराने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार धायरी भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. 30 जून रोजी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी एक लिंक पाठविली. संगणक अभियंत्याने लिंक उघडून पाहिली. त्यानंतर त्यांचा शेअर बाजारविषयक माहिती देणार्‍या समुहात समावेश करण्यात आला. समुहाचा प्रमुख रजत चोप्रा नावाच्या चोरट्याने त्यांना शेअर बाजारातील गुंतवणूक विषयक योजनांची माहीती दिली. त्यानंतर त्यांना एक मोबाइलवर एक अ‍ॅप उघडण्यास सांगितले. त्यामाध्यमातून त्यांनी वेळोवेळी एक कोटी 15 लाख 44 हजार रुपये चोरट्यांच्या खात्यात जमा केले. पैसे जमा केल्यानंतर त्यांना परतावा देण्यात आला नाही.

COMMENTS