Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सूर्यवंशींच्या कुटुंबाला एक कोटीची नुकसान भरपाई द्यावी : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

मुंबई : परभणी हिंसाचार घटनेनंतर पोलिस कोठडीत मृत्यू झालेल्या पीडित सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला एक कोटी रूपयांची नुकसान भरपाई देण्यासोबतच व

स्वाभिमानासाठी येणारी निवडणूक जिंकावी लागेल
बेलापूरच्या उपसरपंचपदी मुश्ताक शेख
लाखाची लाच घेताना सहाय्यक फौजदार एसीबीच्या जाळ्यात

मुंबई : परभणी हिंसाचार घटनेनंतर पोलिस कोठडीत मृत्यू झालेल्या पीडित सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला एक कोटी रूपयांची नुकसान भरपाई देण्यासोबतच विविध मागण्यांसाठी वंचितचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी अ‍ॅड. आंबेडकरांनी आपल्या मागण्यांचे निवदेन देखील दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, परभणी प्रकरणातील पीडित सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्या, परभणीत पोलिसांनी क्रूरतेने केलेल्या मारहाणीत बळी पडलेल्यांची यादी करण्यासाठी आणि पुरेशी भरपाई देण्यासाठी सर्वेक्षण करा, 1 जानेवारी रोजी होणार्‍या भीमा कोरेगावच्या अभिवादन सोहळ्यापूर्वी फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांविरुद्ध कोणत्याही प्रकारचा हिंसाचार आणि चुकीची माहिती भडकावण्याच्या कोणत्याही प्रयत्नांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि ते हाणून पाडण्यासाठी पोलिसांना निर्देश द्यावेत, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी थेट लाभ हस्तांतरण योजना रद्द करा आणि पूर्वीची प्रणाली पुन्हा सुरू करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात बोलतांना अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले की, परभणीत पोलिसांनी क्रूरपणे केलेल्या मारहाणीत बळी पडलेल्यांची यादी करून त्यांना पुरेशी भरपाई देण्याची आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी डीबीटी रद्द करण्यासाठी सल्लामसलत करण्यासाठी, सर्वेक्षण करण्याची आमची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्य केली आहे.

COMMENTS