कराड / प्रतिनिधी : एक देश, एक निवडणूक समितीमधील सदस्यांनी नुकताच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी संवाद साधला. यावेळी पृथ्वीराज चव्ह

कराड / प्रतिनिधी : एक देश, एक निवडणूक समितीमधील सदस्यांनी नुकताच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी संवाद साधला. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी मत मांडत विधेयक योग्य की अयोग्य? याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.
’एक देश एक निवडणूक’ विधेयकबाबत केंद्र सरकारकडून संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती 17 मे ते 19 मे दरम्यान तीन दिवसाच्या महाराष्ट्र दौर्यावर आहेत. या समितीने राज्याचे गृह, अर्थ, विधी, शिक्षण, शिष्टाचार, निवडणूक या विभागातील वरिष्ठ अधिकार्यांबरोबर तसेच राज्यातील प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली. खा. पी. पी. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली 21 खासदारांचा या समितीत समावेश आहे. यावेळी समितीने माजी मुख्यमंत्री, सर्व प्रमुख पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व प्रमुख नेते यांच्याशी चर्चा केली. यात पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. या नेत्यांशी समितीच्या सदस्यांनी सविस्तर आणि दीर्घ चर्चा केली. यावेळी खा. सुप्रिया सुळे, खा. मनीष तिवारी, खा. अनिल देसाई, खा. अनुराग ठाकूर, खा. संबित पात्रा यांच्यासह विविध पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते.
COMMENTS