Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात लाच घेतांना एकास अटक

25 हजाराची लाच घेतल्याप्रकरणी कारवाई

पुणे ः ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकरणात तक्रार मिटवण्यासाठी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकाच्या नावाने एक लाख रुपयांची लाच मागून 25

मग आता संजय राऊत ज्योतिषी झाले काय ?
ऑनलाइन गेममध्ये हरल्यानंतर तरूणाची आत्महत्या
राहुल गांधींच्या सावरकरविरोधी वक्तव्यामुळे नवे वादंग

पुणे ः ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकरणात तक्रार मिटवण्यासाठी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकाच्या नावाने एक लाख रुपयांची लाच मागून 25 हजार रुपये घेतल्या प्रकरणी खाजगी व्यक्ती लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या एसीबीच्या जाळ्यात आला आहे. तुषार शितल बनकर (वय-30)असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून बनकर हा आंबेगाव पठार या ठिकाणी राहावयास आहे. तसेच इम्पोर्ट एक्स्पोर्टचा व्यवसाय करतो
याबाबत एसीबीने आरोपी विरोधात कारवाई केली आहे. एसीबीकडे तक्रार दाखल केलेल्या 42 वर्षीय व्यक्तीने याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाणे येथे आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार तुषार बनकर याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम सात नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन तसेच सायबर युनिट याठिकाणी फसवणुकीचा ऑनलाईन तक्रार अर्ज दाखल होता. सदर अर्जामध्ये चौकशी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक संजय नरळे साहेबांना सांगून मदत करण्यासाठी व प्रकरण मिटवण्यासाठी खाजगी व्यक्ती तुषार बनकर यांनी पीएसआय करिता एक लाख रुपयांची लाचेची मागणी केली. याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केली. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता, तुषार बनकर यांनी पोलिस उपनिरीक्षक संजय नरळे यांना सांगून मदत करतो व प्रकरण मिटवतो असे सांगून संजय नरळे यांच्या करीता एक लाख रुपये याची मागणी केली. ते पैसे टप्प्याटप्प्याने देण्यास सांगून लाचेचा पहिला हप्ता 25 हजार रुपये घेण्यात आले आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून एसीबीचे पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर पुढील तपास करत आहे. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. शितल जानवे, सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

COMMENTS