Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुन्हा एकदा रविवार असुन सुद्धा तहसीलदार सुहास हजारे यांनी वडवाडी ग्रामस्थांचा अडवलेला रस्ता खुला करून दिला-डॉ.गणेश ढवळे

बीड प्रतिनिधी - तालुक्यातील मौजे.बोरखेड ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत वडवाडी येथील 150 लोकसंख्या असलेल्या अवचर, नवले, भोसले, गायकवाड,सुरवसे वस्तीवरी

यवतमाळ जिल्ह्यातील 15 बाजार समितीत 637 उमेदवार रिंगणात
मिरवणुकीत आमदार संजय गायकवाड यांनी डिजेच्या गाण्यावर धरला ठेका 
सौर ऊर्जा प्रकल्पामुळे पाण्याचे प्रवाह बदलले

बीड प्रतिनिधी – तालुक्यातील मौजे.बोरखेड ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत वडवाडी येथील 150 लोकसंख्या असलेल्या अवचर, नवले, भोसले, गायकवाड,सुरवसे वस्तीवरील ग्रामस्थांचा दैनंदिन रहदारीचा रस्ता बांध कोरण्याच्या तसेच बांधावरील झाडे,झुडपे तोडल्याच्या वादातून जेसीबी यंत्राच्या सहाय्याने मोठमोठाली बाभळीची झाडे टाकून अडवण्यात आला होता.संबधित प्रकरणात ग्रामस्थांनी तहसिल कार्यालयात लेखी तक्रार सुद्धा केली होती.सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी प्रत्यक्ष अडवलेल्या रस्त्याची पाहणी करत तहसीलदार सुहास हजारे यांना छायाचित्रे व व्हिडिओ पाठवत फोनवर संवाद साधत रस्ता खुला करून द्यावा अशी विनंती केली होती.काल दि.22 एप्रिल शनिवार रोजी  सुहास हजारे यांनी घटनास्थळी येण्याचे आश्वासन दिले होते.त्याप्रमाणे आज रविवार असून सूद्धा वडवाडी येथील अडवलेल्या रस्त्याची पाहणी करत ग्रामस्थांसोबत चर्चा करून रस्ता खुला करून दिला.याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. शेतकर्‍यांसाठी सुट्टीच्या दिवशी धाऊन येण्याची तहसीलदार सुहास हजारे यांची दुसरी वेळ यापुर्वीही मौजे.सोमनाथवाडी येथील कदम, दाभाडे,जाधव, इंगोले, शेळके आदि.वस्तीवरील ग्रामस्थांचा रहदारीचा रस्ता जेसीबी यंत्राच्या सहाय्याने खोदून अडवला होता तेव्हाही डॉ.गणेश ढवळे यांच्या विनंतीवरून त्याच दिवशी रविवार असुन सुद्धा प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन जेसीबीने रस्त्यावरील खड्डा बुजवला होता.आजही रविवार कार्यालयीन सुट्टीचा दिवस असुन सुद्धा प्रत्यक्ष हजर राहून रस्ता खुला करून दिला याबद्दल बालाघाटावरील ग्रामस्थांकडून कौतिकाचा वर्षात होत आहे.

COMMENTS