समस्यांचे लेखी निवेदन घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहनदौलतनगर / वार्ताहर : पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी, समस्या जागेवर सो
समस्यांचे लेखी निवेदन घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन
दौलतनगर / वार्ताहर : पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी, समस्या जागेवर सोडविण्याकरीता गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली मंगळवार, दि. 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वा.पाटण येथील तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. कोविड संसर्गानंतर राज्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांचे अध्यक्षतेखाली पहिला जनता दरबार होत आहे. जनता दरबारामध्ये ना. शंभूराज देसाई हे पाटण विधानसभा मतदारसंघातील सुपने मंडलसह जनतेच्या समस्या व विकास कामासंदर्भातील अडी-अडचणी जाणून घेणार आहेत. ना. शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखालील जनता दरबारास जिल्हास्तरीय अधिकारी यांचेसह पाटण व कराड तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणांचे खातेप्रमुख यांना निमंत्रित केले आहे. मतदारसंघातील जनतेने आपल्या समस्यांची लेखी निवेदने घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ना. शंभूराज देसाई यांच्या कार्यालयाकडून प्रसिध्दी पत्रकाव्दारे करण्यात आले आहे.
आमदार शंभूराज देसाई हे राज्याचे नामदार झालेनंतर पहिल्यांदा मंगळवार, दि. 15 फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या जनता दरबारास जिल्हास्तरीय सर्व यंत्रणांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे दि. 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वाजता तहसिल कार्यालय, पाटणच्या प्रांगणात आयोजित केलेल्या जनता दरबारास पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व व सुपने मंडलसह आम जनतेने बहुसंख्येने उपस्थित राहून आप-आपले प्रलंबित प्रश्न, समस्या तसेच विकास कामांबाबतच्या अडचणींचा तातडीने निपटारा करुन घेण्यासाठी आपल्या समस्यांची लेखी निवेदने जनता दरबारामध्ये सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
COMMENTS