समतेच्या वाटेवर..!

Homeताज्या बातम्यासंपादकीय

समतेच्या वाटेवर..!

सलग दुसऱ्यांदा डिएमके पक्षाचे प्रमुख म्हणून निवडून आल्यानंतर तामिळनाडू चे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांन ठामपणे सांगितले की, त्यांचे सरकार अध्यात्मवाद

आंद्रे रसेलचा वाढदिवस
राज्यात गँगवार करणारे सत्तेत नको
विमान आकाशात झेपावताच विमानातून निघाल्या ठिणग्या

सलग दुसऱ्यांदा डिएमके पक्षाचे प्रमुख म्हणून निवडून आल्यानंतर तामिळनाडू चे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांन ठामपणे सांगितले की, त्यांचे सरकार अध्यात्मवाद आणि धार्मिक श्रद्धांच्या विरोधात नाही. हे द्रविड-मॉडेल सरकार असून अध्यात्मवाद आणि लोकांच्या धार्मिक श्रद्धांच्या विरोधात नाही. परंतु लोकांमध्ये भेदभाव पसरवण्याबरोबरच राजकीय कारणांसाठी आणि स्वार्थी हेतूंसाठी अध्यात्मवादाचा वापर करणाऱ्यांच्या विरोधात हे सरकार आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या सरकारचे धोरण स्पष्ट केले. तामिळ मातीतील धार्मिक संस्कृती जाणणाऱ्या लोकांना हे चांगले समजते,” वल्लालरच्या द्विशताब्दी वर्षाच्या स्मरणार्थ मुपेरम विझाचे उद्घाटन केल्यानंतर स्टॅलिन म्हणाले, मला याचा पुनरुच्चार करावासा वाटतो कारण सोशल मीडियावर काही लोक माझ्या भाषणाचा सुरुवातीचा भाग ठळक करून नंतरचा भाग कापून स्टालिन अध्यात्मवादाच्या विरोधात बोलले होते, असा अपप्रचार करित असल्याचेही ते पुढे म्हणाले. फार पूर्वी, वल्लालरने जगाला सांगितले की जात आणि धार्मिक व्यवस्था अस्सल नाहीत आणि त्यांचा निषेध केला. आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत, वालार यांनी जाती आणि धार्मिक व्यवस्थेच्या विरोधात काम केले आणि लोकांना त्यांनी आपसात भांडण न करण्याचा सल्ला दिला. त्याचे वैभव पसरवणे हे द्रविड-मॉडेल सरकारचे कर्तव्य आहे असून पेरियार ईव्ही रामासामी यांनी १९४० च्या दशकात वल्लालरच्या श्लोकांचा संग्रह प्रकाशित केला होता आणि माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी यांनी अध्यात्मिक दिग्गजांच्या स्मरणार्थ वल्लालार नगरची स्थापना केली होती याची आठवणही मुख्यमंत्र्यांनी केली. द्रमुक सरकारने वल्लार यांची जयंती परोपकारी दिन म्हणून घोषित केली आहे. वडालूर येथे वल्लालर शिकवणीसाठी आंतरराष्ट्रीय केंद्र स्थापन करण्याचे डीएमके चे ४१९ वे निवडणूक वचन पूर्ण करताना, सरकारने तज्ञ समितीकडून सूचना प्राप्त केल्या आहेत. तामिळनाडू चे मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन यांच्या वक्तव्यावर आजचा विषय घेण्यामागचा उद्देश असा की, कालच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जातीव्यवस्थेतील विषमता आणि उच्चनीच भेदभावाबरोबर जातीव्यवस्थेचे उच्चाटन करण्याचे वक्तव्य केले होते. भारतीय समाजात असणाऱ्या विषमतेवर बोट ठेवून त्यांनी ब्राह्मण समाजाने यासाठी पापक्षालन करायला हवे, असे त्यांनी म्हटले होते. त्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत असताना चर्चा देखील होत आहेत. अशा वातावरणात तामिळनाडू राज्यात दोन चर्चा अतिशय महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत. त्यातील पहिला विषय म्हणजे तामिळनाडू चे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी आपले सरकार धर्म आणि धर्मश्रध्दांच्या विरोधात नसून त्याचा वापर राजकारणात करणाऱ्यांच्या विरोधात असल्याचे स्पष्ट करतानाच तेथील लेखक, विचारवंत, चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर बुद्धिजीवी राजराज चोल म्हणजे इ. स. ९८५ ते इ. स. १०३४ या कार्यकाळात राज्य कारभार करणारे राजा चोल हे हिंदू नसल्याचे मांडत आहेत. त्यांच्या मते राजा चोल यांच्या काळात भारतातील जैन आणि बौध्द धर्म कमकुवत झाले होते, तर, अजून हिंदू या शब्दाचा उगमही झाला नव्हता. त्यामुळे, राजराज चोल यांच्या जीवनावर आधारलेल्या चित्रपटात त्यांना हिंदू म्हटले गेल्याने चर्चेचं वादळ उठले आहे. राजा चोल यांच्या काळात शैव आणि वैष्णव संप्रदाय मोठ्या प्रमाणावर दक्षिण भारतात प्रचलित होते. शैव संप्रदाय हा राजा चोल यांच्या आकर्षणाचा भाग होता. त्यामुळे, राजा चोल हे हिंदू नव्हे तर शैव राजा होते, असा निष्कर्ष तमिळ बुद्धिजीवी आणि विचारवंतांनी काढला आहे. थोडक्यात सांगायचे तर, जात, धर्म, संप्रदाय यावर देशात आता सर्वच स्तरातून उभे राहत असणारे विचार देशाला एका योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी ठोस पार्श्वभूमी बनवत आहेत. ही एक अभिनंदनीय बाब आहे!

COMMENTS