Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्हॅलेंटाईन डे निमित्त सह्याद्री देवराईकडून हडपसरच्या वडाला सातार्‍यात पुनर्रोपणाद्वारे जीवदान

सातारा / प्रतिनिधी : सुमारे शंभर वर्ष वयाच्या, पण मालकाला नकोशा झाल्याने कुर्‍हाड कोसळलेल्या हडपसरच्या वडाला सातार्‍यात पुनर्रोपणाद्वारे जीवदान द

सरकारी नोकर्‍यांमध्ये कंत्राटी पध्दतीने नोकर भरतीचा दुर्भाग्यपूर्ण निर्णय : आ. पृथ्वीराज चव्हाण
इस्लामपूर बाजार समिती निवडणुकीत 49 जणांची माघार; राष्ट्रवादी विरूध्द शेतकरी परिवर्तन पॅनेलमध्ये थेट लढत
अवकाळी पावसाने झालेल्या शेतपीक नुकसानीचा अंतिम अहवाल आठवडा भरात सादर करावा: मंत्री अनिल पाटील

सातारा / प्रतिनिधी : सुमारे शंभर वर्ष वयाच्या, पण मालकाला नकोशा झाल्याने कुर्‍हाड कोसळलेल्या हडपसरच्या वडाला सातार्‍यात पुनर्रोपणाद्वारे जीवदान देण्यात अभिनेते सयाजी शिंदे यांच्या ’सह्याद्री देवराई’ संस्थेला यश आले. वृक्षांचे मानवतेशी असलेले श्‍वासाचे नाते चिरंतन रहावे, म्हणून 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 ते 6 या वेळेत म्हसवे (डी मार्ट जवळ, ता. सातारा) येथे या वटवृक्ष सोबत अनोखा ’व्हलेंटाईन डे’ साजरा करण्यात आला. 20 हुतात्मा जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ 20 झाडे लावण्यात आली. वृक्षाची महती सांगणारी गाणी गाण्यात आली. कवी विठ्ठल वाघ यांनी ’झाड वडाचे ताठ उभे’ हे गीत या समारंभासाठी पाठवले होते. त्याचे गायन करण्यात आले.
सह्याद्री देवराई संस्थेचे संस्थापक सयाजी शिंदे म्हणाले, अडचण होत आहे असे समजून वड कापायला निघालेल्या हडपसरच्या एका व्यक्तीकडून आम्ही शंभर वर्ष वयाचा हा वटवृक्ष शास्त्रोक्तपध्दतीने पुनर्रोपणासाठी हलवला. लांब ट्रकमधून सातार्‍याला गोळीबार मैदान, म्हसवे येथे नेवून पुनर्रोपण केले. त्याला जीवदान मिळून पालवी फुटली आहे. व्हलेंटाईन डे ला आम्ही सर्व वृक्षप्रेमी नागरिक, वारकरी, विद्यार्थी या पालवी फुटलेल्या वटवृक्षा भोवती जमून त्याचे कोडकौतुक केले. रस्त्यांच्या कामात कापले जाणारे वृक्ष अशा पध्दतीने वाचवले पाहिजेत. सरकारनेही पुढाकार घेतला पाहिजे. रानाला आग लावणे, पेटवणे, वणवे प्रकार थांबले पाहिजेत. ’जंगल में फायर नही, फ्लॉवर होना चाहिए’.
शंभर वर्षाचं झाड पुनरुज्जीवन करायला फक्त 25 हजार खर्च आला. अडचण होते, म्हणून ही झाडं काढून टाकून देता कामा नये. हा तर राष्ट्रीय वृक्ष आहे. त्याचे सन्मानाने 26 जानेवारी रोजी म्हसवे (सातारा) येथे पुनर्रोपण करण्यात आले. निवडणुकीत जिंकला तरी एखाद्याची आपण मिरवणूक काढतो. इथे तर शंभर वर्षाचा राष्ट्रीय वृक्ष वाचला आहे. म्हणून त्याच्या पालवी सोबत प्रार्थना करण्यात आली. सुवासिनींनी पूजा केली. सयाजी शिंदे यांनी वटवृक्षाला अभिषेक केला.
संस्थेचे विश्‍वस्त धनंजय शेडबाळे म्हणाले, वडासारख्या मोठया झाडांना वाचवता येते, जीवदान देता येते, हा संदेश देण्यासाठी हा उपक्रम आम्ही व्हॅलेंटाईन डे दिवशी करतो आहोत.
पानसरे नर्सरी (श्रीगोंदा) चे संचालक बाळासाहेब पानसरे यांनी या वटवृक्षाच्या पुनर्रोपणाच्या सर्व प्रक्रियेचे व्यवस्थापन केले. 14 फेबुवारी रोजी या कार्यक्रमात पुनर्रोपणाच्या तंत्राची माहिती देण्यात आली.
जिल्हा पोलीस प्रमुख अजय बन्सल, श्रीकांत इंगळहळीकर, धनंजय शेडबाळे, मुकेश धीवर, मनोज बाविसकर, सुजीत जगदाळे, बाळासाहेब पानसरे, भानुदास गायकवाड, डॉ. रोशनआरा शेख, प्रा. तानाजी देवकुळे, प्रा. केशव पवार, प्रा. डॉ. बाबासाहेब कांगुने, डॉ. सचिन माने, प्रा. रवींद्र महाजन, प्रा. रामचंद्र गाडेकर, राजेंद्र आफळे, प्रा. विजय निंबाळकर, शाहीर चरण उपस्थित होते. प्रा. सुजित शेख यांनी सूत्रसंचालन केले.

COMMENTS