Homeताज्या बातम्यासंपादकीय

शपथविधीच्या निमित्ताने ..

लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रासाठी धक्कादायक निकाल लागले असून, महायुतीचे पुरते पानीपत झाले आहे. खरंतर अजित पवार यांना आपला पक्ष किमान दोन जागा मिळ

विरोधाभास की उतरती कळा
उपयुक्तता आणि राजकारण
अंबानी, अदानी आणि राजकारण

लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रासाठी धक्कादायक निकाल लागले असून, महायुतीचे पुरते पानीपत झाले आहे. खरंतर अजित पवार यांना आपला पक्ष किमान दोन जागा मिळवेल अशी अपेक्षा होती, मात्र ती पुरती फोल ठरली आहे. राष्ट्रवादीचा एकच खासदार निवडून आल्यानंतर केंद्रात तरी संधी मिळेल अशी अपेक्षा असतांना ती अपेक्षा देखील फोल ठरतांना दिसून येत आहे. त्यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे खच्चीकरण तर करण्यात येत नाही ना, अशी शंका पक्षाचे कार्यकर्ते घेतांना दिसून येत आहे.
वास्तविक पाहता अजितदादांची अवस्था इकडे आड-तिकडे विहीर अशीच झाली आहे. परतीचे दोर अजितदादांनी कापून टाकले आहेत, त्यामुळे त्यांना भाजपशी जुळवून घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर भाजपकडून स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्रीपद देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र कॅबिनेट मंत्रीपद भूषवलेल्या प्रफुल्ल पटेल यांना राज्यमंत्री पदावर त्यांची वर्णी अजितदादांनी मान्य केली नाही. त्यामुळे आम्ही वाट बघण्यास तयार आहोत, मात्र राज्यमंत्रीपद स्वीकारणार नाही, असा दावा ऐनवेळी अजित पवारांनी केल्यामुळे राष्ट्रवादीच्या वाट्याला एकही मंत्रीपद मिळालेले दिसून येत नाही. मात्र शेवटच्या घटकेला देवेंद्र फडणवीस यांनी जादूची कांडी फिरवून जर राष्ट्रवादीला कॅबिनेट मंत्रिपद दिल्यास नवल वाटायला नको. मात्र यानिमित्ताने भाजपने पुण्यातील प्रथम निवडून आलेले मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची संधी दिली आहे. त्यामुळे भाजप पुण्यात आपले हात-पाय पसरवण्यास इच्छूक असल्याचे दिसून येत आहे.

तर पुण्यातील दादागिरी मोडीत काढण्यासाठी तरूण आणि आक्रमक चेहर्‍याला मंत्रिपदाची संधी देण्यात आल्याची चर्चा सुद्धा रंगतांना दिसून येत आहे. वास्तविक पाहता पुणे म्हणजे अजितदादांचा बालेकिल्ला. कित्येक वर्ष अजितदादा पुण्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत. या जिल्ह्यात त्यांचा वरचष्मा आहे. मात्र बारामती निवडणुकीत जरी ही वरचष्मा दिसून आला नाही, तरी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजितदादा या वरचष्मा ठेवण्यासाठी प्रयत्न करतील यात शंका नाही, मात्र त्याआधीच भाजपने मुरलीधर मोहोळ यांना ताकद दिली आहे. तर दुसरीकडे भाजपने रक्षा खडसे यांना देखील मंत्रिपदाची संधी दिली आहे. त्यामुळे भाजप पुन्हा एकदा रक्षा खडसे यांना संधी देवून एकनाथ खडसे यांच्यासोबत जुळवून घेण्याच्या तयारीत दिसून येत आहे. तर या लोकसभा निवडणुकीत दलित मते भाजपपासून दुरावल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा जवळ आणण्यासाठी रामदास आठवले यांना मंत्रीपदाची संधी देण्यात येत असल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळे भाजप विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आपल्या सहकार्‍यांना बळ देण्यासाठीच तशी व्यूहरचना भाजपने केल्याचे दिसून येत आहे. त्यातच शिंदे यांच्या शिवसेनेला किमान दोन मंत्रिपदे मिळतील अशी अपेक्षा होती, मात्र त्यांच्या वाट्याला देखील एकच मंत्रिपद देण्यात येत आहे. त्यामुळे भाजपने मित्रपक्षांच्या बाबतीत आपले हातचे राखून ठेवण्याचे धोरण कायम ठेवल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात राजकीय घडामोड घडू शकतात, त्यासाठीच भाजप जाणीवपूर्वक पावले टाकतांना दिसून येत आहे. राज्यात महायुतीमध्ये तीन पक्ष सहभागी आहेत. अजितदादांच्या पक्षात अनेक ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना प्रदीर्घ असा अनुभव आहे, मात्र पक्षफुटीनंतर देखील त्यांना यश मिळतांना दिसून येत आहे. यासोबतच काँगे्रसमधून भाजपमध्ये आलेले अशोक चव्हाण यांनादेखील मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र नांदेडची जागा हातातून गेल्यानंतर अशोक चव्हाण यांचा विधानसभा निवडणुकीला कितपत फायदा होईल, याविषयी भाजप साशंक असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे त्यांनादेखील बळ देणे भाजपने टाळले आहे. शिवाय महाराष्ट्र भाजपमध्ये गेल्या काही वर्षांपासून नाराजी आहे. कारण 115 आमदार असूनही भाजपच्या नेत्यांना सत्तेत वाटा मिळाला नाही, कारण भाजपने मित्रपक्षांना अर्थात शिंदे गट आणि अजित पवार यांच्या पक्षाला मोठी संधी दिली होती, मात्र भाजप आता आपल्या सहकार्‍यांना बळ देवून राज्यात भाजप पक्ष बळकट करण्यासाठीच ही व्यूहनीती आखत असल्याचे दिसून येत आहे. 

COMMENTS