Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ना.धनंजयजी मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त रंगभरण स्पर्धा उत्साहात संपन्न

परळी वैजनाथ प्रतिनिधी - नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा कॅबिनेट मंत्री,महाराष्ट्र राज्य मा.ना.श्री.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांवर बिहारमध्ये गुन्हा दाखल
15 व्या वित्त आयोगातून घंटा गाडी खरेदी; शेडगेवाडी ग्रामपंचायतीचे कौतुकास्पद पाऊल
नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध

परळी वैजनाथ प्रतिनिधी – नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा कॅबिनेट मंत्री,महाराष्ट्र राज्य मा.ना.श्री.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव श्री.प्रदीपजी खाडे साहेब यांच्या संकल्पनेतून नाथ शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दि.8 जुलै ते 15 जुलै सप्ताह निमित्त विविध स्पर्धा व सामाजिक उपक्रम अंतर्गत आज दिनांक-14-07-2023 शुक्रवार रोजी नाथ शिक्षण संस्था,परळी वैजनाथ संचलित सौ.शारदाबाई गुरुलिंगअप्पा मेनकुदळे माध्यमिक विद्यालय संगम, ता.परळी वैजनाथ येथे आज रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्येची देवता माता सरस्वती प्रतिमेचे पूजन करून या स्पर्धेचे उद्घाटन संगम ग्रामपंचायतचे सरपंच श्री.अच्युत चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री.उत्तम साखरे सर व प्रमुख पाहुणे म्हणून नाथ शिक्षण संस्थेचे समन्वयक तथा यशवंतराव चव्हाण कॉलेजचे प्राचार्य श्री.अतुल दुबे सर व जि.प. प्रा.शाळा संगमचे मुख्याध्यापक श्री. अशोक नावंदे सर उपस्थित होते.  या वेळी मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक अशोक नावंदे सर म्हणाले की विद्यार्थ्यांनी सुध्दा आपल्या जीवनात इंद्रधनुष्याप्रमाणे रंग भरावेत आपल्या आई-वडिलांचे व आपल्या शाळेचे नाव मोठे करावे.  रंगभरण स्पर्धेमध्ये शाळेतील विद्यार्थी,विद्यार्थिनी जि.प.शाळा संगम येथील विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाले.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रे सर तर आभारप्रदर्शन गिराम सर यांनी केले या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक कराड सर, राठोड सर व मिलिंद नरबागे , दिलीप स्वामी कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

COMMENTS