Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा बँकेच्या निमित्ताने सहकार मंत्री कराड दक्षिणेत भाजपच्या गोठात

कराड / प्रतिनिधी : सातारा जिल्हा बँकेच्या सोसायटी गटातून कराड येथून सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले य

साडेबारा हजार शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यावर तीन महिन्यांचा लाभ
वन विभागाच्या कर्मचार्‍यांकडून तरास नैसर्गिक अधिवासात
वैरण आणण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍यांवर बिबट्याचा हल्ला

कराड / प्रतिनिधी : सातारा जिल्हा बँकेच्या सोसायटी गटातून कराड येथून सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांच्या गटातील मतदारांच्या भेटीगाठीवर भर दिला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे मंत्री सध्या भाजपच्या गोटात जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने असल्याचे चित्र पहायला मिळत नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेसचे अ‍ॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांना धोबीपछाड करण्यासाठी भाजपची मदत घेत आहेत.
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट दिसून येत असून कराड सोसायटी गटातील निवडणुकीकडे जिल्ह्याचे नव्हे तर राज्यातील जाणकारांचे लक्ष लागून राहिले. अशावेळी राष्ट्रवादीचे नेते, मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सोसायटी गटातून अर्ज भरल्याने निवडणूक प्रतिष्ठेची बनलेली आहे. त्यामुळे राज्यात व देशात राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीचा विरोधी पक्ष असलेला भाजपाच्या मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर राष्ट्रवादीचे पक्षाचे आमदार बाळासाहेब पाटील जोर दिला आहे.
कराड दक्षिणमधील भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांच्या गटाशी सहकारमंत्र्यांनी जवळीक सुरू केली आहे. सहकारमंत्र्यांचे बंधू जयंत पाटील यांची आणि माझी मैत्री असल्याचे खुद्द डॉ. अतुल भोसले यांनी दोनच दिवसापूर्वी सांगितले आहे. मात्र, अ‍ॅड. उदयसिंह पाटील हेही मित्र होते. त्यामुळे सोसायटी गटातून कोणाला मदत करणार हे ठरलेले नसून योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असा सूचक इशारा डॉ. भोसले यांनी दिला आहे. मात्र, तरीही सहकारमंत्री यांनी डॉ. भोसले यांच्या कृष्णा सहकारी साखर कारखन्यांचे उपाध्यक्ष जगदीश जगताप यांची त्यांच्या वडगाव हवेली येथील फॉर्म हाऊसवर अर्ज दाखल करण्याच्या अगोदर भेट घेतली होती.
सोसायटी गटातून अर्ज दाखल केल्यानंतर आटके येथील स्व. पैलवान संजय पाटील यांच्या निवासस्थानी त्यांचे बंधू धनाजी पाटील यांची भेट घेतली. तर स्व. माजी मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर यांचे कट्टर समर्थक बेलवडे बुद्रुकचे पै. जगन्नाथ मोहिते यांच्या निवासस्थानी भेट झाली. पै. जगन्नाथ मोहिते हे विलासकाका याचे विश्‍वासू मात्र त्यांचे घरातील पुढच्या पिढीची जवळीकता भोसले कुटुंबिया सोबत वाढली असल्याने सहकारमंत्री यांनी कराड दक्षिणेत भाजपच्या गोठातील मतदारांना गाठले आहे.

COMMENTS