Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

७६ व्या स्वातंत्रदिनानिमित्त राष्ट्रवादी भवनात ध्वजारोहण उत्साहात साजरा

रोजगार मेळाव्यातून नाशिकमधील बेरोजगारी दूर करण्याचा प्रयत्न-समीर भुजबळ

नाशिक प्रतिनिधी - ७६ व्या स्वातंत्रदिनानिमित्त राष्ट्रवादी भवन येथे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात साजरा करण्यात आला.

LokNews24 lसंभाजी राजे यांची न्यायासाठी न्याय प्राप्ती संघर्ष
30 एप्रिलपर्यंत सरसकट संपूर्ण बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय
लायन्स क्लब ऑफ राहाताने घेतल्या निबंध स्पर्धा

नाशिक प्रतिनिधी – ७६ व्या स्वातंत्रदिनानिमित्त राष्ट्रवादी भवन येथे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार, विष्णुपंत म्हैसधुणे, बाळासाहेब कर्डक, नानासाहेब महाले, दिलीप खैरे, जयंत जाधव, अशोक सावंत,  अंबादास खैरे, संजय खैरनार, अॅड.गौरव गोवर्धने, समाधान जेजुरकर भालचंद्र भुजबळ किशोर गरड समाधान तिवंडे आदि व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि, स्वातंत्र्य विरांमुळे आपल्या भारतीयांना उंच स्वाभिमानाने जगता येणे शक्य झाले आहे. त्यांनी केलेल्या कार्यामुळे व दिलेल्या बलिदानामुळे आजच्या पिढीला उच्च शिक्षण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याने वावरता येत आहे. भारतात युवकांची संख्या मोठी असल्याने भारताला जगात पुढे जाण्याची सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील युवकांना रोजगार मिळावा याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून नाशिकमध्ये भव्य रोजगार महोत्सव भरविण्यात आला होता. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून राष्ट्रवादी जिल्ह्यातील विविध गावपातळीवर पोहचली. यातून विविध क्षेत्रातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली. अशा पद्धतीचे कामगार मेळावे व महिलांकरिता मेळावे करता येतील का या प्रश्नासाठी प्रयत्न असणार असल्याचे समीर भुजबळ यांनी सांगितले. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांसह लोकसभा व विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी होणार आहे. राष्ट्रवादी जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष असून जास्तीत जास्त उमेदवारांची भर यामध्ये टाकण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. नाशिककरांना विविध प्रश्न भेडसावत असून त्यांचे निरासरण करून लोकांच्या मनात पक्षाचे नाव बिंबवण्याची आवश्यकता असल्याचे समीर भुजबळ यांनी उपस्थितांना सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार यांनी उपस्थितांना संबोधले.  तर शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS