Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात गणपती विसर्जनाच्या दिवशी दोघांची हत्या

पुणे ः अंनत चर्तुदशी दिवशी पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहरात पोलिस गणेश विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तात असताना, पुण्यात दोघांच्या हत्या झाल्याची घटन

मालाड मालवणी इमारत दुर्घटना : मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये
तू फक्त नगरला ये, तुझा दरबार उधळून लावू
रुपयाची घसरण महागाईला निमंत्रण

पुणे ः अंनत चर्तुदशी दिवशी पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहरात पोलिस गणेश विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तात असताना, पुण्यात दोघांच्या हत्या झाल्याची घटना घडली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीत बावधन येथे एका तरुणाचा गळा धारदार हत्याराने कापण्यात आला असून पुण्यातील विश्रांतवाडीमध्ये प्रेम प्रकरणातून एका महिलेची हत्या करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन याठिकाणी तुषार बालवडकर यांच्या जागेत ग्रीन ड्रीम नर्सरी आहे. सदर ठिकाणी काम करत असलेला तरुण प्रवीण कुमार भोला महतू (वय-26,मु.रा. बिहार) याचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अनोळखी कारणासाठी धारदार हत्याराने गळा कापून हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सदर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी पोलिस करत असून सदर हल्लेखोराची ओळख पटवून त्याचा शोध घेण्यात येत आहे. तर, विश्रांतवाडी याठिकाणी घडलेल्या खुनाबाबत पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी माहिती दिली की, गौरी देवळेकर (वय-25) हीचा तिचा जुना प्रियकर अमोल दिलीप कांबळे (25, रा. रत्नागिरी) याने चाकूने वार करुन निघृण खून केला आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, गौरी देवळेकर ही मुळची रत्नागिरी येथील रहिवासी असून तिचे तीन वर्षापूर्वी बीड मधील पिंपळनेर येथील एका तरुणासोबत प्रेमविवाह झाला होता. मागील दोन महिन्यापूर्वी ती पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात कळसवाडी याठिकाणी रहाण्यास आली होती. आरोपी अमोल कांबळे यास तिने त्याच्याशी विवाह न करता दुसर्‍यासोबत प्रेमविवाह केल्याचा राग होता त्यातून ती पुण्यात रहाण्यास आल्याचे समजातच तो रत्नागिरी येथून पुण्यात आला. त्याने तिचा शोध घेऊन तिच्याशी संर्पक करत, तिला मंगळवारी रात्री सव्वाआठ वाजता भेटून तिच्यावर थेट चाकूने हल्ला केला. या घटनेत ती जखमी झाली होती तिला ससून रुग्णालयात दाखल केल्यानंतर बुधवारी सकाळी सात वाजता तिचा दुर्देवी मृत्यु झाला आहे. याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे.

COMMENTS