Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घरपट्टी पाणी पट्टी थकबाकी वसुलीसाठी सांगली महापालिका अॅक्शन मोड वर

सांगली प्रतिनिधी - महापालिकेच्या थकीत घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिका अॅक्शन मोडवर आली आहे. घरपट्टी थकीत असणाऱ्या बड्या थकबाकीदारांच्

आता बावन्न टक्के पूर्ण घेऊ !
तुमचे आजचे राशीचक्र, शुक्रवार, २४ जून २०२२ | LOKNews24
आगडगावचे भैरवनाथ मंदिरात आमटी भाकरीच्या महाप्रसादाला प्रारंभ

सांगली प्रतिनिधी – महापालिकेच्या थकीत घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिका अॅक्शन मोडवर आली आहे. घरपट्टी थकीत असणाऱ्या बड्या थकबाकीदारांच्या नावांचे बोर्ड आता चौकात झळकणार असून थकबाकी असणाऱ्या ग्राहकांचे पाणी कनेक्शन तोडले जाणार आहे. 2 फेब्रुवारीपासून नळ कनेक्शन तोडण्या बरोबर मालमत्ता जप्तीच्या कारवाईला सुरुवात होणार आहे. आतापर्यंत महापालिका क्षेत्रातील 1 लाख घरपट्टी धारकांना जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत तर 40 हजार ग्राहकांना थकबाकी न भरल्यास त्यांच नळ कनेक्शन तोडण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच वसुलीबाबत कुचराई केल्यास कायम कर्मचाऱ्यांची एक वेतनवाढ रोखा तसेच मानधन कर्मचाऱ्यांवर सक्त कारवाई करा , असे आदेशही आयुक्त सुनील पवार यांनी बैठकीत दिले आहे. 

COMMENTS