Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

31 जुलै रोजी अंबाजोगाई शहरातएक शाम रसिके नाम कार्यक्रमाचे आयोजन

अंबाजोगाई प्रतिनिधी - वसुंधरा सेवा प्रतिष्ठान व मराठी पत्रकार परिषद शाखा अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. महंमद रफी या महान कलावंतांच्या

भिमनगरमधील 200 बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड,अत्यावश्यक आणि सुरक्षा किटचे वाटप!
भूलतज्ज्ञ संघटनेची देशव्यापी मशाल यात्रा बुधवारी कराडमध्ये येणार
एफएसएसएआय लाचखोरी प्रकरणाच्या 1 कोटी 42 लाख जप्त

अंबाजोगाई प्रतिनिधी – वसुंधरा सेवा प्रतिष्ठान व मराठी पत्रकार परिषद शाखा अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. महंमद रफी या महान कलावंतांच्या एकेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त 31 जुलै 2023 रोजी अंबाजोगाई शहरातील कलावंतांसाठी एक शाम रफी के नाम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजकाच्या वतीने देण्यात आली आहे.
अंबाजोगाई हे शहर ऐतिहासिक दृष्ट्या व सांस्कृतिक दृष्ट्या मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखले जाते. या शहरातील कलावंतांनी आपल्या कलेचा ठसा संपूर्ण महाराष्ट्रभर निर्माण केलेला आहे. म्हणूनच अखिल विश्वावर आपल्या जादुई स्वरांनी मोहिनी घालणार्‍या विसाव्या शतकातील थोर कलावंत गानसम्राट स्वर्गीय मोहम्मद रफी साहेबांना आपल्यातून जाऊन 41 वर्ष होत आहेत. आजही स्वर्गीय रफी साहेबांचा आवाज प्रत्येक रसिकांच्या मनात आणि कानात रुंजी घालतोय अशा या विसाव्या शतकातील महान कलावंताच्या पुण्यतिथी निमित्य आयोजित कार्यक्रमांमध्ये अंबाजोगाई तसेच परिसरातील संगीत क्षेत्रातील विविध प्रतिथयश कलावंत आपले नगमे सादर करून स्वर्गीय मोहम्मद रफी साहेबांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करणार आहेत अशी माहिती संयोजक तालमार्तंड प्रकाश बोरगावकर व मराठी  पत्रकार परिषदेचे जेष्ठ मार्गदर्शक दत्ता आंबेकर व तालुका अध्यक्ष गजानन मुडेगावकर यांनी दिली आहे. स्वर्गीय मोहम्मद रफी साहेबांचे विविध नगमे व माझ्या मनातील गाणी या मैफिलीमध्ये सादर करण्यात येणार असून हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी खुला असणार आहे .प्रतीथयश कलावंतासाठी व्यासपीठ उपलब्ध असतातच परंतु हौशी कलावंतांनाही हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे, अशा कलावंताना आपली कला सादर करता यावी व रसिकांची भरभरून दात घेता यावी या उद्देशाने येथील न प वाचनालयात असलेल्या स्व. बाळशास्त्री जांभेकर पत्रकार कक्षा मध्ये 31 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे अशी माहिती संयोजक तालमार्तंड प्रकाश बोरगावकर यांनी दिली आहे. नंदकीशोरजी मुंदडा (वसुंधरा सेवा प्रतिष्ठान ) व मराठी पत्रकार परिषद शाखा अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने प्रति वर्षाप्रमाणे हा कार्यक्रम संपन्न होत असून अंबाजोगाई तसेच परिसरातील सर्व रसिकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व स्वर सम्राट स्वर्गीय मोहम्मद रफी साहेबांना श्रद्धांजली अर्पण करावी असे आवाहन करण्यात येत आहे.

COMMENTS