Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वातंत्र्यदिनी मुळा धरण तिरंगा छटांनी भिजले

देवळाली प्रवरा /प्रतिनिधीः मुळा धरणावर फ्लड लाईटींगच्या माध्यमातून भिंती व धरणाचे पाणी तिरंगा छटांच्या आकर्षक चित्र मनमोहित करणारे ठरले. अमृतमहोत

राहुरीत सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ 
पाच लाखाची खंडणी मागितली, पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल
विविध मागण्यांसाठी हिवताप कर्मचार्‍यांचे ठिय्या आंदोलन

देवळाली प्रवरा /प्रतिनिधीः मुळा धरणावर फ्लड लाईटींगच्या माध्यमातून भिंती व धरणाचे पाणी तिरंगा छटांच्या आकर्षक चित्र मनमोहित करणारे ठरले. अमृतमहोत्सवी निमित्त कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या पुढाकाराने आकर्षक विद्यूत रोषणाईचे नियोजन करण्यात आले होते.
मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता पाटील,उपअभियंता विलास पाटील,शाखाभियंता राजेंद्र पारखे यांच्या मार्गदर्शनामध्ये धरणाच्या भिंतींवर आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात आली होती. तिरंगा फ्लड लाईटमुळे भिंतीवर तिरंगा रंगाच्या छटा आकर्षित करणार्‍या ठरत होत्या. यासह धरणाच्या पाण्यावर तिरंगा लेझर वीजेची रोषणाई दिलखेचक ठरली. संपूर्ण पाण्यामध्ये तिरंगा अवतरल्याचा भास रोषणाईने क्षणोक्षणी होत होता. यासह पाण्यावर चलचित्र दर्शविणारे लेझर लाईटच्या प्रवाहाने आपल मुळा धरण,अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा तसेच भारताचा नकाशा व झेंड्याचे चलचित्र पर्यटकांना मोहित करणारे ठरले.आकर्षक तिरंगा लाईटने मुळा धरण अक्षरशः न्हाऊन निघाले होते. संपूर्ण देशामध्ये अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना प्रत्येकाच्या मनात देशभक्तीची भावना जागृत होती. त्याच देशभक्तीला पाठबळ दर्शविण्यासाठी मुळा पाटबंधारे विभागाकडून फ्लड लाईट, लेझर लाईट तसेच तिरंगा छटा दर्शविणारी आकर्षक विद्यूत रोषणाई सर्वानाच प्रभावित करणारी ठरली.
मुळा धरणाच्या पाणलोट व लाभक्षेत्रावर पावसाचा रुसवा आहे. परिणामी लाभक्षेत्रावर कोरड पडली असताना धरणाच्या बॅक वाटरमध्ये अपेक्षित पाणीसाठा जमा झालेला नाही. 26 हजार दलघफू क्षमता असलेल्या मुळा धरणामध्ये सद्यस्थितीला 20 हजार 600 दलघफू पाणीसाठा जमा आहे. चौकट ः अमृतमहोत्सवाचा आनंद द्विगुणित
मुळा धरणाच्या पाणी साठ्यामध्ये अपेक्षित वाढ झालेली नाही. तसेच ऐन मान्सून हंगामातही आवर्तन सोडण्याची दुर्देवी वेळ आली. धरण भरेल की नाही अशा विंवचनेत सापडलेल्या शेतकर्‍यांना मुळा धरणावरील तिरंगी रंगछटा काहीशी आनंद देणारी ठरली. बारागाव नांदूर परिसरातून मुळा धरणाच्या भिंत व पाण्यावर तरंगत दिसणारी तिरंगी रंगछटा तसेच लेझर लाईटने दर्शविणारे चलचित्र आकर्षित करणारे ठरले.

COMMENTS