Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दशनाम गोसावी समाजाच्या वतीने रायगडावर राज्यभिषक सोहळा संपन्न  

नाशिक प्रतिनिधी -  २४  सप्टेंबर १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वितीय राज्याभिषेक सोहळा महंत निश्चलपुरी महाराज यांच्या शुभहस्ते झाला होता ह

आणखी एक पलटी !
नगरपालिकेने केली थकबाकीदाराची दुकाने सील
आरसीएफच्या कामासाठी 89 झाडांवर गंडांतर

नाशिक प्रतिनिधी –  २४  सप्टेंबर १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वितीय राज्याभिषेक सोहळा महंत निश्चलपुरी महाराज यांच्या शुभहस्ते झाला होता ह्या ऐतिहासिक सुवर्णक्षणाची आठवण म्हणून सकल दशनाम गोसावी समाज यांच्या महाराष्ट्रातील हजारो समाज बांधवांच्या उपस्थित २४ सप्टेंबर २०२३  रोजी रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  सातारा , सांगली , कोल्हापूर  , लातूर, नाशिक , पुणे  , मुंबई सह राज्यभरातून  दशनाम गोसावी समाज उपस्थित होते.

उपस्थित समाज बांधवांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस व महंत निश्चलपुरी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार करून समाज बांधवांनी अभिवादन केले.  सदर कार्यक्रम शिव विख्याते प्राध्यापक यशवंत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. नाशिक जिल्ह्यातून नाशिक जिल्हा दशनाम गोसावी समाजाचे अध्यक्ष अनुप गोसावी , सुदर्शन न्यूज चे नाशिक प्रभारी भरत गोसावी सीता गुंफट ट्रस्टचे हिमांशू गोसावी, सनी गोसावी, सचिन गोसावी ,प्राध्यापक प्रदीप भारती, कैलास गोसावी ,रामदास गोसावी ,जुन्या दशनाम गोसावी समाज आखाड्याचे समाजाचे कार्यकर्ते विनोद गोसावी नाशिक रोडचे संजय रतनगीर गोसावी ,शिवसंभा दादा गोसावी, सूर्यकांत गिरी गोसावी संदीप भारती सुध्दाम गोसावी,नंदूभाऊ गोसावी,पंकज भारती,ज्ञानेश्वर गिरी,गोरख गोसावी, दिलीप भाऊ गोसावी, दादासाहेब गोसावी, शाम भाऊ गोसावी, आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS