Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 काँग्रेस पक्षाच्या वतीने  एस बी आय शाखेसमोर डफळी बजाव आंदोलन

अमरावती प्रतिनिधी -  पंतप्रधान नरेंद्र मोदी व उद्योगपती मित्र अदानी यांच्या संबंधातून अदानी समुहाला जास्तीत जास्त फायदा मिळवून दिला जात आहे

नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर अकोल्यात जल्लोष
कार्यकर्त्याने थेट भाषण करणाऱ्या एकनाथ खडसेंच्या हातातून माईक हिसकवला  
मुंबईच्या पर्यटकाचा नौका दुर्घटनेत मृत्यू

अमरावती प्रतिनिधी –  पंतप्रधान नरेंद्र मोदी व उद्योगपती मित्र अदानी यांच्या संबंधातून अदानी समुहाला जास्तीत जास्त फायदा मिळवून दिला जात आहे. देश सध्या गंभीर आर्थिक संकटात असताना केंद्रातील भाजपा सरकार ने सार्वजनिक क्षेत्रातील महत्वाचे प्रकल्प अदानी समुहाला विकण्याचा सपाटा लावला आहे. LIC आणि SBI या सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांमध्ये मध्यमवर्ग, नोकरदार व सामान्य जनतेने गुंतवलेले कष्टाचे पैसे मोदी सरकारने जबरदस्तीने अदानी समुहात गुंतवायला लावले. अदानी समुहातील महाघोटाळा उघड झाल्याने आता सामान्यांचा हा पैसा बुडण्याची भिती निर्माण आहे. मोदी सरकारच्या उद्योगपतीधार्जिण्या धोरणामुळे अदानींचा महाघोटाळा उघड झाला असून जनतेच्या पैसा सुरुक्षित रहावा व या महाघोटाळ्याचा पर्दापाश व्हावा, असे अनेक आरोप करत याविरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने तिवसा एस. बी. आय शाखेसमोर नकली व प्रतिकात्मक चलन (नोटा) फेकून व डफळी वाजून केंद्र सरकारच्या चुकीच्या वित्तीय धोरणाचा निषेध करण्यात आला.

COMMENTS