Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपातर्फे १४ ऑगस्ट रोजी ‘विभाजन विभीषिका दिवस’ पाळला जाणार

नागरिकांच्या सहभागाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचे आवाहन…

नाशिक: भाजपातर्फे १४ ऑगस्ट रोजी  ‘विभाजन विभीषिका दिवस’ पाळला जाणार  असल्याचे भाजप प्रदेश उपाध्यक्ष ( प्रदेश कार्यालय मुख्यालय) माधव भांडारी य

मंत्रीपद न मिळाल्याने छगन भुजबळ संतप्त
बुद्धिबळ वर्ल्डकपमध्ये भारताचा डंका 
बेशिस्त-बेदरकारपणे वाहन चालविणार्‍यांवर कडक कारवाई करा : ना. देसाई

नाशिक: भाजपातर्फे १४ ऑगस्ट रोजी  ‘विभाजन विभीषिका दिवस’ पाळला जाणार  असल्याचे भाजप प्रदेश उपाध्यक्ष ( प्रदेश कार्यालय मुख्यालय) माधव भांडारी यांनी सांगितले ते नाशिक भाजपा कार्यालय वसंतस्मृती  येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव, आ.देवयानी फरांदे,  नाशिक लोकसभा समन्वयक गिरीष पालवे, नाशिक ग्रामीण अध्यक्ष शंकर वाघ, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, माजी महापौर सतीश कुलकर्णी, ज्येष्ठ नेते विजय साने, प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार, प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे, प्रदेश प्रवक्ते प्रवीण अलई, नाशिक महानगर माध्यम विभाग प्रभारी पवन भागुरकर, सुनील केदार, जगन पाटील आदी उपस्थित होते. नागरिकांच्या सहभागाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी  आवाहन ही त्यांनी  केले आहे

           पुढे ते म्हणाले की देशासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या लाखो भारतीयांच्या संघर्ष व बलिदानाचे स्मरण करण्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येस, १४ ऑगस्ट रोजी ‘विभाजन विभीषिका (फाळणीच्या वेदना)  स्मृती दिवस’ पाळण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीने सोडला आहे.  देशाचे विभाजन झाल्यामुळे झालेल्या वेदनांचे स्मरण ठेवण्यासाठी तसेच फाळणीच्या वेळी ज्यांनी प्राण गमावले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन प्रदेश उपाध्यक्ष ( मुख्यालय ) माधव भांडारी यांनी बुधवारी केले.

          श्री.भांडारी म्हणाले की, नव्वद वर्षांच्या ब्रिटीश गुलामगिरीतून मुक्त होऊन प्राप्त झालेल्या स्वातंत्र्याचा यंदाचा अमृत महोत्सव हा प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीने अभिमानाचा सोहळा आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये देश आत्मनिर्भरतेच्या दिशेने विकासपथावर वाटचाल करत असताना स्वातंत्र्याकरिता बलिदान दिलेल्यांचे स्मरण ठेवलेच पाहिजे. या उद्देशाने   १४ ऑगस्ट रोजी  ‘विभाजन विभीषिका (फाळणीच्या वेदना)  स्मृती दिवस’ पाळण्याचा निर्णय  भारतीय जनता पार्टीने घेतला आहे.

           भारताची फाळणी ही धार्मिक आधारावर झालेल्या विश्वासघाताची  कहाणी आहे, अशी भारतीय जनता पार्टीची धारणा असल्याचे श्री. भांडारी म्हणाले . स्वातंत्र्यापूर्वी २० फेब्रुवारी १९४७ या दिवशी ब्रिटीश पंतप्रधान क्लेमंट एटली यांनी स्वातंत्र्याचा निर्णय जाहीर केला. ३० जून १९४८ पूर्वी सत्तेचे हस्तांतरण करून देश सोडण्याचे ब्रिटीशांनी जाहीर केले होते. मात्र, त्याआधी ब्रिटिशांनी देशाची फाळणी केली. भारत आणि पाकिस्तान असे दोन देश निर्माण करून अखंड भारताच्या नकाशाला छेद दिला. ही कृती कधीच विसरता येणार नाही, असे श्री.भांडारी म्हणाले. प्रत्यक्षात स्थलांतराच्या काळात प्रचंड हिंसाचार होऊन जवळपास सव्वा कोटी नागरिकांना सर्वस्व गमावून अक्षरशः रस्त्यावर यावे लागले. सुमारे ६० लाख बिगर मुस्लिमांनी पश्चिम पाकिस्तानातील आपली घरेदारे सोडून भारतात पळ काढला, तर २० लाख बिगर मुस्लिमांनी पूर्व पाकिस्तानातून (आताचा बांगलादेश) घरेदारे सोडून भारतात स्थलांतर केले. या प्रक्रियेत पाच लाखांहून अधिक नागरिकांची हत्या झाली, असे सांगितले जाते. प्रत्यक्षात हा आकडा दहा लाखांहून अधिक असावा, असा अंदाज श्री. भांडारी यांनी बोलून दाखवला. यावेळी पत्रकारांनी फाळणी संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.

COMMENTS