Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी ओंकार दळवी

उपाध्यक्षपदी समीर शेख जिल्हाउपाध्यक्षपदी लियाकत शेख ; सचिवपदी संदेश हजारे

जामखेड ः महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जामखेड तालुक्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून जिल्हाउपाध्यक्षपदी लियाकत शेख, जिल्हा कार्यक

राहात्यात आज यशवंतराव होळकरांच्या पुतळयाची मिरवणूक
शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात 5 कोटींची कामे मंजूर ः आमदार मोनिका राजळे
प्रक्षोभक वक्तव्य करणार्‍या आंदोलकांवर गुन्हा दाखल ; नगरच्या पोलिसांनी केली कारवाई

जामखेड ः महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जामखेड तालुक्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून जिल्हाउपाध्यक्षपदी लियाकत शेख, जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी प्रकाश खंडागळे, दीपक देवमाने तर जामखेड तालुकाध्यक्षपदी पत्रकार ओंकार दळवी, उपाध्यक्षपदी समीर शेख, सचिव पदी संदेश हजारे कार्याध्यक्षपदी सचिन अटकरे तर खजिनदारपदी रामहरी रोडे याच्या नियुक्ती करण्यात आल्या असून निवडीचे पत्र संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाचपुते यांच्या हस्ते देण्यात आले.
      पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे राज्य सचिव सीताराम लांडगे यांच्या सूचनेनुसार काष्टी ता श्रीगोंदा येथील सेवा सोसायटीच्या सभागृहात प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पारनेर, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा येथील जवळपास 200 पत्रकार बैठकीला उपस्थित होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष किरण जोशी म्हणाले की, संघटनेसाठी आणि पत्रकाराच्या हितासाठी आपण एकजुटीने काम करणे आवश्यक आहे. पत्रकारीते सोबत समाजहिताच्या कार्यातही आपण सर्वांनीच एकाजिवाने कामे कराल अशी  आशा आहे. लवकरच पुणे येथे पत्रकार संघाचे अधिवेशन होणार असल्याचे सांगितले. यावेळी नूतन अध्यक्ष ओंकार दळवी यांनी पत्रकारांचे प्रश्‍न आणि विविध योजनांबाबत प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार शिवाजी इकडे, वसंतराव सानप, शंकर कुचेकर विजय राजकार यांच्यसह पत्रकार उपस्थित होते. या निवडीबद्दल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार निलेश लंके, माजी खासदार डॉ. सुजय विखे, आमदार रोहित पवार आमदार राम शिंदे आदीनी अभिनंदन केले.

COMMENTS