ओमीक्राॅन : भितीचे राजकारण!

Homeताज्या बातम्यासंपादकीय

ओमीक्राॅन : भितीचे राजकारण!

 ओमीक्राॅन हा कोरोनाचा नवा व्हेरियंट दक्षिण आफ्रिकेत आढळून येण्यास काही महिन्यांचा कालावधी लोटला आहे. या नव्या व्हेरियंटचा धोका नेमका किती व कसा आहे,

तुकडे बंदीचा फटका सर्वसामान्यांना; शासनाने फेरविचार करण्याची गरज
समर्थ विद्या मंदिर तलवाडा येथे बाल गोपाळांची दिंडी सहल
कर्नाटकात भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू

 ओमीक्राॅन हा कोरोनाचा नवा व्हेरियंट दक्षिण आफ्रिकेत आढळून येण्यास काही महिन्यांचा कालावधी लोटला आहे. या नव्या व्हेरियंटचा धोका नेमका किती व कसा आहे, यासंदर्भात वैद्यकीय क्षेत्रात देखील अजून स्पष्टता नाही! परंतु, भारतीय प्रसारमाध्यमे यावर भरपूर भीती वाढेल, अशाप्रकारे बातम्या आणि चर्चा पसरवायला लागले आहेत. लोकांना योग्य ती शास्त्रीय माहिती देण्याऐवजी लोकांना भीतीदायक वातावरणात कस न्यायचं आणि ठेवायचं हे काम भारतीय मिडिया इमाने इतबारे करत असतो. ओमीक्राॅन या व्हेरियंट ची माहिती मिळताच वैद्यकीयदृष्ट्या योग्य ती काळजी घेण्याचे काम पाश्चिमात्य  देशांत आणि अमेरिकेत सरकार व वैद्यकीय क्षेत्राने सुरू केले. आणीबाणी ची परिस्थिती उद्भवण्याची वाट न पाहता संबंधित व्हेरियंट आणि त्यापासून होणारे इन्फेक्शन कसे रोखता येईल अथवा कमी करता येईल यासाठी या देशांनी प्रयत्न सुरू केले आहेत. हे कार्य करित असताना सर्वसामान्य जनता भितीत येणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जाते. परंतु, भारतात कोरोना आणि त्याचे व्हेरियंट यावर निवडणूक जिंकण्याचे राजकारण करण्याची हातोटी राज्यकर्ते वापरत असल्याचा आरोप भारतीय जनमानसात सातत्याने केला जात आहे! आगामी काळात उत्तर प्रदेश सारखे सर्वात मोठे आणि राजकीयदृष्ट्या सर्वात महत्त्वाचे राज्य मानले जाते. त्याचप्रमाणे पंजाब सारखे राज्य सामाजिक व वर्गीय दृष्टीने महत्वाचे ठरणारे असल्याने या राज्यांच्या निवडणुका केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहेत. काही महिन्यांपूर्वी बिहार, पश्चिम बंगाल सारख्या राज्यांच्या निवडणुका प्रचंड धामधुमीत झाल्या. कोरोनाचे प्रचंड सावट असतानाच सर्व शास्त्रीय व वैद्यकीय प्रोटोकॉल तोडून देशाच्या पंतप्रधान आणि गृहमंत्र्यासह सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी प्रचंड गर्दीच्या सभा घेतल्या. परंतु, या वातावरणात सर्वाधिक फायदा सत्ताधारी पक्षांना पोहचतो किंवा पोहचृला असे जनमानस म्हणत होते. परंतु, प्रत्यक्षात पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी या सत्ताधारी झाल्या तर बिहारमध्ये लालूप्रसाद यांचा राजद ला सर्वाधिक जागा मिळाल्या. असे असले तरी कोरोना काळाचा एकंदरीत फायदा-गैरफायदा भाजपान वेगवेगळ्या राज्यांमध्ये राज्य सरकारे पाडण्यासाठी व आपली सत्ता स्थापन करण्यासाठी याकाळाचा अधिक उपयोग केल्याचा आरोपही चर्चेत राहिला. थोडक्यात, सांगायचे म्हणजे दक्षिण आफ्रिकेत आढळलेला ओमिक्राॅन हा नवा व्हेरियंट नियंत्रित करण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात आहेत; तक्ष आपल्याकडे लोकांना भितीत आणून निवडणूक काळात लाकडाऊन लावून चार भिंतीत कोंडण्याचा पुन्हा प्रयत्न होत आहे, असाच जनतेचा होरा आहे.  अर्थात कोरोनाचा नवा व्हेरियंट आणि भारतीय राजकारण यांचा हा संबंध लावला जात असताना प्रत्यक्षात ओमिक्राॅन  किती धोकादायक आहे, यावर तज्ज्ञ काय म्हणतात, हेदेखील आपण पाहूया!  अमेरिका स्थित भारतीय असणारे डॉ. रवि गोडसे यांच्या मते डेल्टा व्हेरियंट चे इन्फेक्शन मोठ्या प्रमाणात झाल्याने आणि लसिकरण व्यापक स्तरावर झाल्याने ओमिक्राॅनचा भारताला धोका संभवत नाही. तर मुळ भारतीय असणारे ब्रिटनस्थित डॉ. संग्राम पाटील यांच्या मते डेल्टा पेक्षा पाचशे पटीने संसर्ग करणाऱ्या या व्हेरियंटच्या संदर्भात दक्षता घ्यावी. परंतु, सध्या घडिला या व्हेरियंट विषयी भाष्य करणे चूक होईल; कारण ओमिक्राॅन विषयक विस्ताराने काहीही माहिती उपलब्ध नाही. थोडक्यात सांगायचे तर राज्यकर्त्यांनी कोरोनाचा उपयोग करित लोकांना भितीत आणणं आणि त्या अनुषंगाने निवडणूका जिंकण्याचा मानस ठेवू नये! 

COMMENTS