नवी दिल्ली :देशात ओमायक्रॉनने चांगलाच विळखा घातला असून, कोरोना रुग्ण संख्येने 3 लाखांचा आकडा ओलांडला आहे. ओमायक्रॉनचा नवा व्हेरियंट समोर आला असतांनाच
नवी दिल्ली :देशात ओमायक्रॉनने चांगलाच विळखा घातला असून, कोरोना रुग्ण संख्येने 3 लाखांचा आकडा ओलांडला आहे. ओमायक्रॉनचा नवा व्हेरियंट समोर आला असतांनाच आता ओमायक्रॉन समूह संसर्गाच्या टप्प्यावर असल्याची माहिती समोर आल्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. अनेक शहरांमध्ये बाधितांचा आकडा वेगाने वाढत आहे. कोविड नियमांचे पालन आणि लसीकरण ही सर्व व्हेरिएंटिवरोधात ढाल असल्याचेही बुलेटिनमध्ये म्हटले आहे. हा विभाग ओमायक्रॉनच्या नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग करून अहवाल देण्याचे काम करते. तसेच काही राज्यात जिल्हानिहाय तपशील सादर करतात. आतापर्यंत त्यांच्याकडून 1 लाख 50 हजार 710 नमुन्यांचे सिक्वेन्सिंग करण्यात आले आहे, तर 1 लाख 27 हजार 697 नमुन्यांचे पृथ्थकरण करण्यात आले आहे. या बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, ओमायक्रॉनच्या आतापर्यंतच्या केसेस लक्षणे नसलेली किंवा सौम्य स्वरुपाची दिसून आली आहेत. रुग्णालयामध्ये दाखल होणे आणि आयसीयूमध्ये दाखल होण्यामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे तिसर्या लाटेचा धोका कायम आहे. बुलेटिनमध्ये आणखी माहिती देताना म्हटले आहे की, देशात आता सामूहिक संसर्गाच्या टप्प्यावर आहे आणि अनेक मेट्रो शहरांमध्ये तो अधिक प्रबळ झाला आहे. अनेक शहरांमध्ये वेगाने केसेस वाढत आहेत. देशात नवा व्हेरिएंट बी.ए-2 केसेस मोठ्या प्रमाणात आहेत. ड जीन ड्रॉपआउट आधारित स्क्रीनिंगमुळे सर्वांधिक निगेटिव्ह मिळत आहेत.
COMMENTS