श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने सर्वाधिक जागा जिंकत सत्ता स्थापन करण्याच दावा केला होता. त्या
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने सर्वाधिक जागा जिंकत सत्ता स्थापन करण्याच दावा केला होता. त्यानुसार नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी बुधवारी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यासह ते या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री बनले. श्रीनगर येथील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर येथे हा कार्यक्रम झाला.
या सोहळ्यात काँगे्रस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, सपा प्रमुख अखिलेश, आप नेते संजय सिंह यांच्यासह 6 पक्षांचे नेते उपस्थित होते. काँग्रेसने सरकारमध्ये सहभागी होणार नाही, त्यांचा एकही आमदार मंत्री होणार नाही, असा निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
COMMENTS