Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात होणार ऑलिम्पिक भवन

क्रीडामंत्री संजय बनसोडे यांची माहिती

उदगीर/प्रतिनिधी ः राज्यातील क्रीडा क्षेत्राला गती देण्यासाठी आणि क्रीडा संस्कृती रूजवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून, त्यासाठी पुण्यात आंतरर

तुळजाभवानी मंदिरात आता ड्रेसकोड
’लिव्ह इन’चा हट्ट धरणार्‍या तरुणीची हत्या
जळगाव जिल्ह्यातील जवानाला वीरमरण

उदगीर/प्रतिनिधी ः राज्यातील क्रीडा क्षेत्राला गती देण्यासाठी आणि क्रीडा संस्कृती रूजवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून, त्यासाठी पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याची कार्यवाही गतिमान करण्यात आली असून, राज्यात खेळाडूंच्या मदतीसाठी ऑलिम्पिक भवन स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली. ते उदगीर येथे बोलत होते.

यावेळी बोलतांना बनसोडे म्हणाले की, राज्यातील खेळाडूंना चांगल्या सुविधा मिळवून देण्यासाठी क्रीडा विद्यापीठांसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासाठी पुण्यात क्रीडा विद्यापीठ, तसेच या विद्यापीठाच्या कुलगुरूपदी क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती नेमण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथेही क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत 656 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावेत, यासाठी राज्य शासनाचा क्रीडा विभाग प्रयत्नशील आहे. यासाठी खेळाडू केंद्रबिंदू मानून विविध उपक्रम, योजना राबविण्यात येत असल्याची माहिती संजय बनसोडे यांनी दिली. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये राज्यातील अनेक खेळाडू आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करून लौकिक वाढवीत आहेत. सध्या चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही राज्यातील 60 पेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. यापुढेही राज्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावेत, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. राज्याच्या क्रीडा विभागामार्फत लक्षवेध योजनेंतर्गत विविध 12 क्रीडा प्रकारांच्या विकासावर भर देण्यात येणार आहे. ‘खेलो इंडिया’अंतर्गत राज्यामध्ये जास्तीत जास्त क्रीडा अकादमी स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून यासाठी केद्रीय क्रीडा मंत्री यांच्याकडे पाठपुरावा सुरु असल्याचे बनसोडे यांनी सांगितले.

खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिन – राज्यात गेल्या काही दिवसांपासून क्रीडा विभागाकडून अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून, तब्बल तीन वर्षांपासून रखडलेल्या क्रीडा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले आहे. तसेच  कुस्तीपटू स्व. खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस 15 जानेवारी हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बनसोडे यांनी सांगितले.

COMMENTS