Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोदावरीच्या उजव्या कॅनालमध्ये बुडून वृद्धाचा मृत्यू

कोपरगाव प्रतिनिधी ः तालुक्यातील मढी येथील रहिवासी भानुदास मुरलीधर डहाळे यांचे रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शहाजापुर पुला नजिक गोदावरी उज

अहमदनगरमध्ये नगरसेवकावर दिवसाढवळ्या गोळीबाराचा प्रयत्न
ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय स्वागतार्ह ः आ. आशुतोष काळे
वंचितांना ऊबदार ब्लँकेट, कपडे व फराळचे वाटप

कोपरगाव प्रतिनिधी ः तालुक्यातील मढी येथील रहिवासी भानुदास मुरलीधर डहाळे यांचे रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शहाजापुर पुला नजिक गोदावरी उजव्या कॅनालमध्ये मृतदेह तरगंताना आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
रविवारी सांयकाळी कोळगाव माळ येथील बाजार कॅनालच्या रस्त्याने कोळपेवाडी येथे आठवडे बाजारसाठी जात असतांना शहाजापूर पूलानजीक त्यांना पुरुष जातीचा मृतदेह तंरगताना आढळून आल्याने त्यांनी ही माहिती शहाजापूर गावचे पोलिस पाटील इन्द्रंभान ढोमसे यांना दिली. त्यांनी घटनेची माहिती तालुका पोलिस स्टेशनला देत पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक तुषार ढाकराव पोलिस नाईक राजू चव्हाण यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत मृतदेह नागरिकांच्या मदतीने कॅनालमधुन बाहेर काढला. त्यांच्या खिशामधील डायरीच्या मदतीने सदर मृतदेह मढी बु येथील रहिवासी भानुदास मुरलीधर डहाळे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिस उपनिरीक्षक तुषार ढाकराव यांनी घटनास्थळाचा पंचनामा करत डहाळे यांचा मृतदेह  रुग्णवाहिकेच्या  मदतीने उत्तर तपासणी साठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवली मयताचे पुतणे चंद्रकांत डहाळे यांच्या खबरी वरुन कोपरगाव पोलीस स्टेशन ला अकस्मात म्रत्यु ची नोंद करण्यात आली सदर व्यक्ती हि काल रविवारी सकाळ पासुन घरातुन बाहेर पडुन कोळपेवाडी येथील नातेवाईका कडुन औषध गोळ्यासाठी पैसे घेवुन गेली होती दुपारी शहाजापुर 6 चारी कंडेक्सर पिठ या ठिकाणी नागरिकांना डहाळे बसल्याचे आढळून आले होते बुडाले ल्या ठिकाणी चपला व टोपी तर काही अंतरावर पुलाच्या पुढे सांयकाळी डहाळे यांची डेट बाँडी आढळून आली कँनाल ला उन्हाळ्याचे पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी सद्या दुसरे आवर्तन 550 क्युसेसने चालु आहे मागिल आवर्तना मध्ये पोहण्यासाठी गेलेला सुनिल माळी हा युवक पाण्यात बुडवून त्यांचा मृतदेह  या ठिकाणी आढळून आला होता. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने पोहता न येणार्‍या नागरिकांनी पाण्यात उतरू नये असे आवाहन पोलीस पाटील ढोमसे यांनी केले आहे.

COMMENTS