पुणे : पुणे आणि मुंबईतील प्रवाशांसाठी ओला कंपनीने नवीन घोषणा केली आहे. ओलाची प्राईम प्लस बंगळुरुमध्ये यशस्वी झाल्यानंतर आता महाराष्ट्रात सुरु होत
पुणे : पुणे आणि मुंबईतील प्रवाशांसाठी ओला कंपनीने नवीन घोषणा केली आहे. ओलाची प्राईम प्लस बंगळुरुमध्ये यशस्वी झाल्यानंतर आता महाराष्ट्रात सुरु होत आहे. 28 मे रोजी या सेवेची घोषणा करण्यात आली होती. त्याच दिवशी बंगळुरूमधील निवडक प्रवाशांसाठी ही सेवा सुरु झाली. राज्याची आर्थिक राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे शहरात ही सेवा सुरु झाली आहे. मुंबई, पुण्याबरोबर ही सेवा हैद्राबादमध्ये मिळणार आहे. यामुळे देशातील चार शहरांमध्ये प्राईम प्लस सेवा सुरु केली आहे. प्राईप पल्समध्ये प्रवाशांना अखंड प्रवासाची हमी, व्यावसायिक ड्रायव्हर्स अन् इतर अनेक फायदे दिले आहे. यामुळे बुक केलेली ट्रिप चालकाला रद्द करता येणार नाही.
COMMENTS